गडहिंग्लज, साधना हायस्कूल उपांत्य फेरीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गडहिंग्लज, साधना हायस्कूल उपांत्य फेरीत
गडहिंग्लज, साधना हायस्कूल उपांत्य फेरीत

गडहिंग्लज, साधना हायस्कूल उपांत्य फेरीत

sakal_logo
By

गडहिंग्लज, साधना हायस्कूल उपांत्य फेरीत
---
डॉ. घाळी शालेय लीग फुटबॉल; गारगोटी, शाहूकुमार, होरायझनही पात्र
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २० : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे सुरू असलेल्या डॉ. घाळी शालेय लीग फुटबॉल स्पर्धेत १४ वर्षे गटात गडहिंग्लज हायस्कूल, साधना हायस्कूल यांनी आपापल्या गटात अव्वल स्थान पटकावून उपांत्य फेरीत दिमाखात प्रवेश केला. गारगोटीचा शाहूकुमार भवन, न्यू होरायझन स्कूल द्वितीय क्रमांक मिळवत पात्र ठरले. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावरील स्पर्धेत एकूण २० संघ सहभागी आहेत. यंदा स्पर्धेचे २३ वे वर्ष आहे.
अ गटात साधना हायस्कूलने तीन साखळी सामने जिंकले; तर एक बरोबरी अशा दहा गुणांसह आरामात उपांत्य फेरी गाठली. न्यू होरायझन स्कूलने तीन विजयांमुळे नऊ गुण मिळवत दुसऱ्या स्थानासह आगेकूच केली. क्रिएटिव्ह स्कूलला एक विजय आणि एक बरोबरी करीत पाच गुणांसह तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. साई इंटरनॅशनल स्कूल एक विजय आणि दोन पराभवांमुळे चार गुणांसह चौथा राहिला. जागृती अ संघाला एकही विजय मिळविता न आल्याने गुणाचे खाते न उघडता निराशाजनक कामगिरी नोंदवली.
ब गटात गडहिंग्लज हायस्कूलने चौफेर कामगिरी करीत चार विजयासह १२ गुणांमुळे अव्वल स्थान मिळवत सहज उपांत्य फेरी गाठली. गारगोटीच्या शाहूकुमार भवन तीन विजयांमुळे नऊ गुणांसह द्वितीय स्थान पटकावत पात्र ठरला. नवोदित छत्रपती शिवाजी विद्यालय आणि सर्वोदया स्कूलला चार गुणांसह अनुक्रमे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर राहावे लागले. नवख्या केदारी रेडेकर स्कूल, जागृती हायस्कूल ब संघाला गुणाचे खाते उघडण्यात अपयश आले.
-------------------
अंतिम सामना रविवारी
स्पर्धेतील दोन उपांत्य सामने दुपारच्या सत्रात रविवारी (ता. २२) होतील. साधना हायस्कूल विरुद्ध गारगोटी (दुपारी दीड), गडहिंग्लज हायस्कूल वि. न्यू होरायझन (दुपारी अडीच). विजेत्यांत अंतिम सामना सायंकाळी पाचला होईल. त्यानंतर स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ होणार आहे.