बॉडी बिल्डींग स्पर्धा पाच फेब्रुवारीला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बॉडी बिल्डींग स्पर्धा पाच फेब्रुवारीला
बॉडी बिल्डींग स्पर्धा पाच फेब्रुवारीला

बॉडी बिल्डींग स्पर्धा पाच फेब्रुवारीला

sakal_logo
By

बॉडी बिल्‍डिंग स्पर्धा पाच फेब्रुवारीला
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. २५ : येथील पॉवर जिमच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त बॉडी बिल्‍डिंग स्पर्धा होणार आहे. दीड लाखांची पारितोषिके असणाऱ्या या स्पर्धेत कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर अशा चार जिल्ह्यातील शरिरसौष्ठवपटू सहभागी होणार आहेत. सात गटांत पाच फेब्रुवारीला बॅ नाथ पै विद्यालयाच्या मैदानावर सायंकाळी चार वाजता ही स्पर्धा आहे.
स्पर्धा महाराष्ट्र बॉडी बिल्‍डिंग असोसिएशन आणि न्यू कोल्हापूर डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्‍डिंग असोसिएशनच्या मान्यतेने होत आहे. सात गटांत होणार आहे. यात ५५ किलोगट, ५५ ते ६०, ६०-६५, ६५ -७०, ७०-७५, ७५-८०, आणि ८० किलोवरील समावेश आहे. प्रत्येक गटासाठी ५००१, ४००१, ३००१, २००१, १००१ अशी पाच बक्षिसे आहेत. मेन्स फिजिक गटासाठी स्पर्धा आहे. यातील विजेत्याला ७००१, ६००१, ५००१, ४००१, ३००१ अशी पारितोषिके आहेत. प्रतिष्ठेच्या पॉवर जिम श्री २०२३ ला रोख पंधरा हजार रुपये तर उपविजेत्याला ७५०१ रुपये बक्षिस आहे. स्थानिक शरिरसौष्टवपटूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन केल्याचे पॉवर जिमचे प्रमुख इम्रान मुल्ला यांनी सांगितले. शुभम चव्हाण, ओंकार चौगुले आणि सहकारी स्पर्धेचे नियोजन करीत आहेत.