आयसीआरई पारितोषिक वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आयसीआरई पारितोषिक वितरण
आयसीआरई पारितोषिक वितरण

आयसीआरई पारितोषिक वितरण

sakal_logo
By

फोटो क्रमांक :gad164.jpg
83169
गारगोटी : स्थापत्य विभागाच्या विद्यार्थ्यांना करडंक देताना स्वप्नील पाटील. सोबत मधुआप्पा देसाई, अरविंद चौगुले, जयंत घेवडे, उदय पाटील आदी.
------------------------------------
जिद्दीसमोर आकाश ठेंगणे
स्वप्नील पाटील; आयसीआरई वार्षिक पारितोषिक वितरण

गारगोटी, ता. १६ : अनपेक्षित अपघाताने पायच निकामी झाला. पण, जिद्द कायम होती. त्याला मेहनतीची जोड देत आंतरराष्ट्रीय स्तरावर जलतरणात देशाचा झेंडा उंचावू शकलो. त्यामुळे जिद्दीसमोर आकाश ठेंगणे असल्याचे प्रतिपादन अर्जुन पुरस्कार विजेते आंतरराष्ट्रीय जलतरणपटू स्वप्नील पाटील यांनी केले.
येथील इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंगच्या (आयसीआरई) वार्षिक क्रीडा महोत्सव पारितोषिक वितरणावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुआप्पा देसाई अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य जयंत घेवडे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. डॉ पी. के. देसाई, डॉ. अऱविंद कदम, डॉ. एस. एस. टेके, डॉ. रणजित पवार, डॉ. एस. बी आबिटकर यांचा पीएचडी मिळविल्याबद्दल श्री. देसाई यांच्याहस्ते सत्कार झाला. इंटरडिप्लोमा स्पोर्टसमध्ये यश मिळविलेल्या सूर्यविजय पाटील, आदित्य पाटील, खो-खो कर्णधार शंतनू खोत, धावपटू यश सोरटे यांच्यासह सौरभ कुंभार, सौरभ हजारे यांचा क्रीडासाहित्य देऊन गौरव झाला.
सर्वसाधारण विजेतेपद पटकाविणाऱ्या स्थापत्य अभियांत्रिकी विभागाला करडंक देऊन गौरविले. यावेळी मौनी विद्यापीठ कर्मचारी प्रतिनिधी प्रा. अरविंद चौगुले, बाजीराव चव्हाण, उपसरपंच अस्मिता कांबळे, सर्जेराव मोरे, प्रा. एस. ए. मुल्ला, प्रा.संतोष माने, जिमखानाप्रमुख प्रा.पी. एल. रेगडे, प्रा. नंदकुमार राऊळ, एस. आर. शिंदे, युवा पाटील उपस्थित होते. प्राचार्य उदय पाटील यांनी आभार मानले. दीपक कुपन्नावर, यू. पी. सोळसे यांनी सूत्रसंचालन केले.

चौकट...
विद्यार्थी, शिक्षकांना प्रोत्साहन
आयसीआरईने सहा दशकात हजारो प्रतिभावंत घडविले. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षकांना प्रोत्साहन देण्यात कसूर ठेवणार नसल्याचे चेअरमन श्री. देसाई यांनी भाषणात सांगितले.