Wed, March 29, 2023

जागतिक महिला दिन
जागतिक महिला दिन
Published on : 9 March 2023, 3:24 am
रक्तदान शिबिर उत्साहात
गारगोटी : येथील इन्स्टिटयूट ऑफ सिव्हिल अँड रुरल इंजिनिअरिंग (आयसीआरई) मध्ये रक्तदान शिबिर झाले. राष्ट्रीय सेवा योजना आणि महिला समितीतर्फे शिबिर झाले. मौनी विद्यापीठाचे चेअरमन मधुआप्पा देसाई यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी मौनी विद्यापीठ कर्मचारी प्रतिनिधी प्रा. अरविंद चौगुले, प्राचार्य जयंत घेवडे, प्राचार्य उदय पाटील, डॉ. एल. एस. पाटील, अमोल गुरव, प्रबंधक प्रताप भोईटेंसह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. शिबिर समन्वयक प्रा. डी. व्ही. ओतारी यांनी स्वागत केले. दीपक कुपन्नावर यांनी आभार मानले. कोल्हापूरच्या संजीवन ब्लड बँकेने रक्तदानाची प्रक्रिया पार पाडली. पन्नास पिशवी रक्तसंकलन झाले. पी. व्ही व्हनगुत्ते, मयूर पिळणकर, एस. एस. टेके, के. एन. मोरे, आर. एन. भाई आणि सहकाऱ्यांनी शिबिर यशस्वी केले.