
सॉप्टक्लोन्स आंतरजिल्हा स्पर्धा
gad289.jpg
91990
गारगोटी : सॉप्टक्लोन स्पर्धेतील विजेत्यांना संतोष माने यांच्याहस्ते बक्षीस देऊन गौरविले. यावेळी आर. व्ही. पोवार, शिवलिंग स्वामी, अस्मिता प्रधान उपस्थित होते.
--------------------------------
ऋषीकेश पोवार, गीता पाटील विजेते
सॉप्टक्लोन्स आंतरजिल्हा स्पर्धा; बापूजी साळूंखे पॉलिटेक्निकचे वर्चस्व
गारगोटी, ता. २८ : येथील इन्सटिट्यूट ऑफ सिव्हिल अँड रुरल इंजिनिंअरिंगतर्फे (आयसीआरई) झालेल्या सॉप्टक्लोन्स आंतरजिल्हा स्पर्धेला प्रतिसाद मिळाला. ‘सी कोडिंग’ गटात कोल्हापूरच्या ऋषिकेश पोवारने तर पोस्टरमध्ये महागावच्या गीता पाटील, प्रतीक्षा दोरगुडे यांनी पहिला क्रमांक पटकाविला. कोल्हापूरच्या बापूजी साळुंखे पॉलिटेक्निकच्या (बीएसआइटी) विद्यार्थ्यांनी अधिक बक्षिसे जिंकून वर्चस्व राखले. स्पर्धेचे एकविसावे वर्ष असून ३४५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
आयसीआरईतील कॉम्प्युटर विभागातर्फे दरवर्षी स्पर्धा होते. स्पर्धा समन्वयक प्रा. डॉ आर. व्ही. पोवार यांनी प्रास्ताविकात स्पर्धेची माहिती दिली. विभागप्रमुख प्रा. संतोष माने यांच्या हस्ते उद्घाटन झाले. महागावच्या संत गजानन कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख प्रा. शिवलिंग स्वामी म्हणाले, “हँकर रँक, कोड शेफसारख्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांनी विविध अडचणी सोडवण्याचा सराव उपयुक्त ठरेल.’
टेक्निकल क्वीझ (स्पर्धक ९२) , पेपर (१६) आणि पोस्टर (२२), सी कोडींग (१२८), बुध्दीबळ ५७ अशा पाच विभागांत ही स्पर्धा झाली. स्पर्धेनंतर बक्षीस वितरण झाले. तन्वी देसाई हिने स्वागत केले. कर्मवीर हिरे महाविद्यालायाच्या विभागप्रमुख डॉ अस्मिता प्रधान, श्री. स्वामी यांच्या हस्ते विजेत्यांना रोख बक्षीस आणि प्रमाणपत्र देऊन सत्कार केला. यावेळी धनराज चौगुले, सुमीत देसाई , प्रा. मयुर पिळणकर, प्रा. सी. डी. कुमरे, एम. एम. मुळे उपस्थित होते. सृष्टी पाटील हिने सूत्रसंचलन, प्रतीक मिसाळ यांनी आभार मानले.
चौकट..
स्पर्धेचा निकाल
राजवर्धन देसाई (गारगोटी), पार्थ निळकंठ (कोल्हापूर) पेपर सादरीकरण- ऋषीकेश पोवार, सई घोरपडे स्वप्नील दळवी (कोल्हापूर), तन्वी देसाई, आदित्य भेंडवडेकर (गारगोटी), पोस्टर सादरीकरण- आर्या सदलगे, तेजस वडर (गारगोटी), केतकी शिंदे (कोल्हापूर) प्रश्नमंजूषा - आरिफ मुलाणी ( पाल), महमंदकैफ दरवाजकर, विलास महात्मे (गारगोटी), बुध्दीबळ- साहिल बावदळे (रत्नागिरी), रोहन कडकुरे ( गडहिंग्लज).