अभियांत्रिकी प्रवेश

अभियांत्रिकी प्रवेश

Published on

अभियांत्रिकी पदवी पहिली यादी जाहीर

गडहिंग्लज, ता. २६ : विद्यार्थी आणि पालकांची उत्कंठा लागून राहिलेली अभियांत्रिकी पदवी प्रथम वर्षाची पहिली यादी जाहीर झाली आहे. अपेक्षेप्रमाणे यंदा मेरिटमध्ये वाढ झाली आहे. यादीतील विद्यार्थ्यांना शुक्रवार (ता. २८) अखेर संबधित महाविद्यालयात मूळ कागदपत्रे आणि शुल्क घेऊन प्रवेश निश्चित करायवयाचा आहे. रविवार (ता. ३०) पासून प्रवेशाची दुसरी फेरी सुरु होईल. प्रवेशाच्या एकूण तीन फेऱ्या आहेत.
यावर्षी आभियांत्रिकीची प्रवेश प्रक्रिया गेल्या वर्षीच्या तुलनेत उशिरा २४ जूनपासून सुरु झाली. राज्यात अनेक ठिकाणी झालेला मोठा पाऊस आणि दाखले मिळण्यातील दिरंगाईमुळे अर्ज भऱण्यासाठी मुदत वाढवली होती. १९ जुलैला पक्की गुणवत्ता यादी लागून त्याच दिवशी राज्यातील विविध संस्थांत उपलब्ध असणाऱ्या जागांचा तपशील जाहीर झाला. २२ जुलैपर्यंत पहिली विकल्प फेरी झाली. काल (ता. २५) रात्री उशिरा प्रवेश मिळालेल्यांची पहिली यादी सीईटी सेलच्या https://fe2023.mahacet.org या संकेतस्थळावर जाहीर झाली.
पहिल्या यादीतील विद्यार्थ्यांना शुक्रवारअखेर संबधित संस्थेत मूळ कागदपत्रे आणि शुल्कासह प्रवेश निश्चित करायचा आहे. सीईटीचा निकाल वाढल्याने मेरीटमध्येही वाढ झाली. पहिल्या फेरीसाठी पहिला विकल्प सक्तीचा आहे. दुसऱ्या विकल्पानंतरचे विद्यार्थी पसंतीचा अभ्यासक्रम आणि महाविद्यालय मिळवण्यासाठी बेटरमेंन्ट अथवा प्रवेश टाळू शकतात. दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची माहिती शनिवारी जाहीर होईल. तीस जुलै ते १ ऑगस्टअखेर दुसरी विकल्प फेरी आहे. तीन ऑगस्टला दुसरी यादी लागणार आहे. दुसऱ्या फेरीसाठी पहिले तीन विकल्प सक्तीचे आहेत. राज्यात ३३२ महाविद्यालयांत १ लाख ३८ हजार ८३ प्रवेश क्षमता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.