इंग्लीश स्कुल हेब्बाळ जलद्याळला विजेतेपद

इंग्लीश स्कुल हेब्बाळ जलद्याळला विजेतेपद

gad1313.jpg
37709
गडहिंग्लज शासकिय कबड्डी सतरा वर्षे विजेता हेब्बाळ जलद्याळ हायस्कुलचा संघ.
--------------------------------
इंग्लीश स्कुल हेब्बाळ जलद्याळला विजेतेपद
शासकिय सतरा वर्षे कबड्डी : मुलींच्यात वि. दि. शिंदे हायस्कुलला अजिंक्यपद, बसर्गे उपविजेते
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १३ : शासकीय तालुकास्तरीय फुटबॉल स्पर्धेत दुसऱ्या दिवशी सतरा वर्षे गटात मुलांच्यात हेब्बाळच्या न्यू इंग्लीश स्कुलने तर मुलींत स्थानिक वि. दि. शिंदे हायस्कुलने विजेतेपद पटकावले. बसर्गेच्या एस. एम. हायस्कुलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. भडगाव (ता. गडहिंग्लज) येथील शिंदे एज्युकेशन कँम्पसच्या मैदानावर स्पर्धा झाल्या. स्पर्धेत ३६ संघांनी सहभाग घेतला होता.
मुलांच्या विभागात उपांत्य फेरीत हेब्बाळ जलद्याळने तुल्यबळ महागावच्या शिवाजी विद्यालयाचा तर जागृती हायस्कुलने नेसरीच्या एस. एस. हायस्कुलवर मात करून अंतिम फेरी गाठली होती. हेब्बाळ जलद्याळचे हुकमी खेळाडू प्रेम दावणे, हर्षद कलबिद्री, राजवर्धन पाटील यांनी धडाकेबाज खेळ करून जागृतीला नामोहरम केले. जागृतीच्या अभिषेक शिरगांवे, स्वप्नील विभुते, संकेत कल्याणी यांचे प्रयत्न अपुरे पडले. शेवटी पाच गुणांनी हेब्बाळ जलद्याळने विजेतेपद मिळवत खेळाडूंनी जल्लोष केला.
मुलींच्या विभागात वि. दि. शिंदे हायस्कुलने करबंळीच्या संघाचा सहा गुणांनी पाडाव करून अजिंक्यपद साकारले. शिंदेच्या दिपाली कदम, अंबिका आरबोळे, संध्या तोडकर यांनी अष्टपैलू खेळ करून विजेतेपदात सिंहाचा वाटा उचलला. नंदनवाडच्या वैष्णवी फडके, सुप्रिया मगदूम, प्राची मुरुकटे यांची झुंज व्यर्थ ठरली. दरम्यान, नंदनवाडने बसर्गेचा तर शिंदेने करबंळीला हरवून अंतिम फेरीत प्रवेश केला होता. विजय आबीटकर, व्ही. एम. गुरव, विनायक शिंदे, विकास दावणे, संदेश कोकितकर यांनी पंच म्हणून काम पाहिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com