सामानगडावर झाडांना पाणी देऊन शिवजयंती

सामानगडावर झाडांना पाणी देऊन शिवजयंती

gad104.jpg
82781
गडहिंग्लज : सामानगडावर झाडांना पाणी पाजून शिवजयंती साजरी करताना विजेता मंडळाचे कार्यकर्ते.
--------------------------------
सामानगडावर झाडांना
पाणी देऊन शिवजयंती
गडहिंग्लजमधील विजेता तरुण मंडळाचा उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : येथील गुणे पथवरील विजेता तरुण मंडळाने अनोख्या पद्धतीने शिवजयंती साजरी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सामानगडावरील झाडांना टँकरने पाणी घालून शिवजयंती साजरी केली. वणव्यामुळे होरपळलेल्या झाडांना या पाण्यामुळे आधार मिळाला. खासकरून ज्येष्ठांनी पुढाकार घेऊन राबवलेल्या शिवजयंती उपक्रमाचे स्वागत झाले.
विजेता तरुण मंडळातर्फे वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. यंदाची शिवजयंती पारंपरिक फोटोपूजन, मिरवणूक याला फाटा देऊन समाजोपयोगी उपक्रमांनी साजरी करण्याचे कार्यकर्त्यांनी ठरवले. खासकरून या परिसराचा ऐतिहासिक ठेवा असणाऱ्या सामानगडावर महिनाभरापूर्वी पेटलेल्या वणव्यामुळे झाडे होरपळली होती. त्यांना पाण्याच्या गरजेचे वृत्त ‘सकाळ’ने दिले होते. याला प्रतिसाद देत अनेकांनी पाण्याच्या टँकरसाठी पुढाकार घेतला. या पार्श्‍वभूमीवर विजेता मंडळातर्फे झाडांना पाणी देण्याचा निर्णय झाला. दुपारी तीन वाजता विजेता तरुण मंडळाच्या महिला, लहान मुले आणि ज्येष्ठ कार्यकर्ते सामानगडावर दाखल झाले. पाण्यासाठी टँकरची व्यवस्था केली होती. प्रत्येक झाडाभोवती पाण्यासाठी आळं करून पाणी सोडले. यात लहान मुले आणि महिलांचा सहभाग लक्षवेधी होता. शिवाजी महाराजांचा जयघोष करीत तीन तासांहून अधिक काळ गडावरील शंभरहून अधिक होरपळलेल्या झाडांना पाणी पाजले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com