काळभैरव डोंगरावर वृक्षारोपणाची तयारी

काळभैरव डोंगरावर वृक्षारोपणाची तयारी

लोगो ः सकाळ इम्पॅक्ट

gad33.jpg
87526
गडहिंग्लज : काळभैरी डोंगरावर ग्रीन अर्थ फाउंडेशनमार्फत वृक्षारोपणासाठी खड्डे मारले जात आहेत.
-------------------------------------------------------
काळभैरव डोंगरावर वृक्षारोपणाची तयारी
हिरवळ वाढवण्यासाठी नियोजन : ग्रीन अर्थ फौंडेशनतर्फे १००० झाडे लावणार
सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ३ : काळभैरी मंदिर डोंगर परिसरात झाडाअभावी हिरवळ विरळ होत चालली आहे. त्यासाठी ‘काळभैरी डोंगर हिरवाईने नटवा’ असे आवाहन ‘सकाळ’ने बातमीद्वारे केले होते. हिरवळीसाठी वृक्षारोपणांची गरज व्यक्त केली होती. त्याला प्रतिसाद देत ग्रीन अर्थ फौंडेशनतर्फे वन विभागाच्या मदतीन १००० झाडे लावण्यात येणार आहेत. आज डोंगरावर वृक्षारोपणासाठी खड्डे मारण्याचे काम सुरू झाले.
डोंगर कपारीतील या मंदिरात रोज शेकडो भाविक दर्शनासाठी येतात. मुख्यतः हा परिसर निसर्गरम्य असल्याने सहकुटुंब दर्शनासाठी दर रविवारी आणि अमावस्येला गर्दी असते. डोंगरालगतच शेंद्री पाझर तलाव असल्याने हा परिसर एक छोटे पर्यटनस्थळ म्हणूनच ओळखला जातो. पण, अलीकडे परिसरातील काही जुनी झाडे जीर्ण तर काही मोडून पडली. परिणामी, परिसराची हिरवळ विरळ होत चालली आहे. त्यामुळे डोंगर परिसर ओसाड दिसू लागला आहे.
या पार्श्‍वभूमीवर डोंगरावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाची गरज पर्यावरणप्रेमींतून व्यक्त होत होती. ‘सकाळ’ने यासाठी बातमीद्वारे आवाहन केले. ग्रीन अर्थ फाउंडेशनमार्फत वृक्षारोपणाची नियोजन केले आहे. त्यासाठी सुमारे एक लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. फौंडेशनचे रवींद्र बेळगुद्री यांनी टोकण म्हणून २५ हजार रुपये पहिली मदत जमा केली. आज डोंगरावर जेसीबीने वृक्षारोपणासाठी खड्डे मारण्याचे काम सुरू झाले. या वेळी श्री. बेळगुद्री, डॉ. सुप्रिया रुद्रापगोळ, अमोल देसाई, तुकाराम जाधव, मारुती चव्हाण, अमन मुल्ला आणि सहकारी उपस्थित होते.
--------------
पहिल्या टप्‍प्यात वनविभागाच्या मदतीने १००० देशी झाडे लावण्याचे नियोजन आहे. त्यासाठी आज खड्डे मारण्याचे काम सुरू केले. पाऊस सुरू झाल्यावर झाडे लावण्यात येतील.
-रवींद्र बेळगुद्री,
प्रवर्तक, ग्रीन अर्थ फौंडेशन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com