डेव्हलपमेंट फुटबॉल लीग आजपासून गडहिंग्लजमध्ये

डेव्हलपमेंट फुटबॉल लीग आजपासून गडहिंग्लजमध्ये

डेव्हलपमेंट फुटबॉल लीग
आजपासून गडहिंग्लजमध्ये

शिवराज युनायटेड ट्रॉफी : रोज सायंकाळी दोन सामने, ५० हजारांची बक्षिसे

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. ५ : येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विद्या संकुलातर्फे गुरुवार (ता. ६) पासून डेव्हलपमेंट फुटबॉल लीग स्पर्धेला प्रारंभ होत आहे. स्पर्धा ११ जूनअखेर होत आहे. रोज सायंकाळच्या सत्रात दोन सामने होणार असून, स्पर्धेत सहा संघांचा सहभाग आहे. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर होणाऱ्या शिवराज युनायटेड ट्रॉफीसाठी रोख ५० हजारांची बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेचे यंदाचे ११ वे वर्ष आहे.
कुमार आणि युवा खेळाडूंना अधिक सामने खेळण्याचा अनुभव मिळावा, हा या स्पर्धेचा उद्देश आहे. पंधरा, अठरा आणि एकोणीस, एकवीस वर्षांखालील खेळाडूंचा संघात समावेश आहे. गेले दहा दिवस निवडलेल्या खेळाडूंचे सराव शिबिर झाले. रंगतदार बोलीद्वारे खेळाडूंची श्रेयस-अर्थव वॉरियर्स, गुफा गार्डियन्स, संघर्ष फायटर्स, दादा जीएम चॅलेंजर्स, इफा लायन्स, युनायटेड रायझिंग स्टार्स अशा सहा संघांत विभागणी केली आहे. सर्व खेळाडूंना संघाचे किट देण्यात आले आहे.
सायंकाळी साडेचार वाजता शिवराज शिक्षण संकुलाचे विश्वस्त दिग्विजय कुराडे यांच्या हस्ते स्पर्धेला प्रारंभ होईल. ज्येष्ठ खेळाडू डॉ. सुरेश संकेश्र्वरी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. यावेळी तानाजी देवार्डे, सिकंदर यळकुद्रे, गुंडू पाटील, अलिखान पठाण, गौस मकानदार, नंदू पाटील उपस्थित राहणार आहेत. प्रत्येक सामन्यातील विजयी संघातील खेळाडूला ‘सामनावीर’, तर पराभूत संघातील खेळाडूला ‘लढवय्या’ म्हणून क्रीडा साहित्य देऊन गौरविण्यात येईल. फुटबॉल शौकिनांनी उपस्थित राहून नवोदित खेळाडूंना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन युनायटेडचे अध्यक्ष मल्लिकार्जुन बेल्लद, उपाध्यक्ष डॉ रवींद्र हत्तरकी, ‘शिवराज’चे सचिव डॉ. अनिल कुराडे यांनी केले आहे. स्पर्धेचे नियोजन समन्वयक रोहित साळुंखे, अनिकेत कोले करीत आहेत.
.....
चौकट....
आजचे सामने
गुफा गार्डियन्स वि. इफा लायन्स ः सायंकाळी ४.३० वा.
संघर्ष फायटर्स वि. श्रेयस अर्थव वॉरियर्स ः सायंकाळी ५.३० वा.
.............

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com