अंतिम लढत इफा लायन्स, गुफा गार्डियन्समध्ये

अंतिम लढत इफा लायन्स, गुफा गार्डियन्समध्ये

89183
गडहिंग्लज : डेव्हलपमेंट फुटबॉल लीगमधील इफा लायन्स विरुद्ध श्रेयस-अथर्व वॉरियर्समधील चुरशीचा क्षण. (आशपाक किल्लेदार : सकाळ छायाचित्रसेवा)
............
अंतिम लढत इफा लायन्स, गुफा गार्डियन्समध्ये

शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट लीग : विद्याधर धबालेचे दोन गोल, आज अंतिम सामना

सकाळ वृत्तसेवा
गडहिंग्लज, ता. १० : शिवराज युनायटेड डेव्हलपमेंट फुटबॉल लीगच्या विजेतेपदासाठी इफा लायन्स आणि गुफा गार्डियन्स यांच्यात अंतिम लढत निश्चित झाली. आज उपांत्य फेरीत त्यांनी प्रतिस्पर्ध्यांना नमवून अंतिम फेरी गाठली. त्यांनी अनुक्रमे श्रेयस-अथर्व वॉरियर्स आणि युनायटेड रायझिंग स्टार्स यांचे आव्हान संपुष्टात आणले. गुफाच्या विद्याधर धबालेने दोन गोल करून दिवस गाजविला. स्पर्धा येथील गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशन आणि शिवराज विद्या संकुलातर्फे एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर सुरू आहे.
चुरशीच्या पहिल्या उपांत्य सामन्यात गुफा गार्डियन्सने युनायटेड रायझिंग स्टार्सला ३-१ असा धक्का दिला. पूर्वार्धात वर्चस्व राखणाऱ्या युनायटेड रायझिंग स्टार्सला गुफा गार्डियन्सने बचावात्मक पवित्रा घेत रोखल्याने गोलफरक मध्यंतरापर्यंत कोरा राहिला. उत्तरार्धात ३२ व्या मिनिटाला फ्री किकवर विद्याधर धबालेने उत्कृष्ट गोल करत खाते उघडले. पाठोपाठ ३५ व्या मिनिटाला विद्याधरनेच मैदानी गोल करीत आघाडी वाढवली. ४१ व्या मिनिटाला कर्णधार आर्यन दळवीने हेडद्वारे गोल करून संघाचा विजय निश्चित केला. शेवटच्या ठप्प्यातील रायझिंगच्या वर्धन अनंतपुरेचा गोल संघाला तारू शकला नाही.
रंगतदार दुसऱ्या सामन्यात इफा लायन्सने श्रेयस-अथर्व वॉरियर्सवर ३-१ अशी मात केली. पूर्वार्धाच्या सहाव्या मिनिटाला महेश पोवारने मैदानी गोल करून इफाला आघाडीवर नेले. २० व्या मिनिटाला इफाचा गोलरक्षक आदित्य जाधवचा स्वयंगोल झाल्याने सामना १-१ असा बरोबरीत आला. मध्यंतरानंतर ३१ व्या मिनिटाला सुमित पनोरेने गोल करून इफाची २-१ अशी आघाडी वाढवली. कर्णधार सौरभ मोहितेने गोलक्षेत्राबाहेरून उत्कृष्ट फटका मारून तिसऱ्या गोलची नोंद करत विजय निश्चित केला. सूरज हनिमनाळे, प्रसाद पोवार, अवधूत चव्हाण यांचे प्रयत्न अपुरे ठरले. ‘सामनावीर’ म्हणून विद्याधर धबाले, सुहास पाटील तर वर्धन अनंतपुरे, सुमित पाटोळे यांना ‘लढवय्या’ म्हणून गौरविण्यात आले.
...
चौकट...
आजचे सामने
तिसरा क्रमांक : श्रेयस-अथर्व वॉरियर्स वि. युनायटेड रायझिंग स्टार्स ः सकाळी ८ वा.
अंतिम सामना : इफा लायन्स वि. गुफा गार्डियन्स ः सकाळी ९ वा.
....................

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com