

02823
मुंबई, कोल्हापूर, इचलकरंजी उपांत्य फेरीत
राज्यस्तरीय हॉकी : यजमान तिरंगाची बेळगाववर मात
सकाळ वृत्तसेवा
नूल, ता. १४ : येथील तिरंगा क्रीडा मंडळ, न्यू इंग्लिश स्कूल आणि आजी-माजी खेळाडू यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेला आज उत्साहात प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी मुंबईचा महाराष्ट्र पोलिस, कोल्हापूर पोलिस, इचलकरंजीचे महाराष्ट्र मंडळ यांनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून विजयी सलामी दिली. यजमान तिरंगा क्रीडा मंडळाने बेळगावला २-१ असे नमवून उपांत्य फेरी गाठली. उद्या (ता. १५ ) सकाळी उपांत्य फेरीचे तर सायंकाळी अंतिम सामना होणार आहे.
सकाळी नऊलाकल्लाप्पाण्णा नडगदल्ली यांच्याहस्ते स्पर्धेचे उदघाटन झाले. यावेळी ज्येष्ठ प्रशिक्षक एस. आऱ. जाधव, श्रीरंग चौगुले, जयसिंगराव चव्हाण यांच्यासह खेळाडू उपस्थित होते. सचिन शिंदे यांनी स्वागत केले. सचिन पोवार यांनी आभार मानले. पहिल्या सामन्यात तिरंगा क्रीडा मंडळाने बेळगावचा २-१ असा पाडाव केला. तिरंगाच्या रितेश मांगलेने पहिला मैदानी गोल करून धडाकेबाज सुरवात केली. पण, बेळगावच्या प्रवीणने गोल करून सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. उत्तरार्धात तिरंगाच्या प्रज्वल काळेने निर्णायक गोल करून स्थानिक शौकिनांना जल्लोषाची संधी दिली.
दुस-या सामन्यात इचलकरंजी महाराष्ट्र क्रीडा मंडळाने फिरोज वस्ताद, सरोज पाटीलच्या गोलमुळे गदग स्पोर्टसवर २-१ अशी मात केली. गदगचा गोल करणारा जीवनची झुंज व्यर्थ ठऱली. रंगतदार सामन्यात मुंबई पोलिसने कोल्हापूरच्या महाराष्ट्र क्रीडा मंडळाला २-१ असे पराजित करून आव्हान संपुष्टात आणले. दोन गोल करणारा मुंबईचा रोहन पोवार विजयाचा शिल्पकार ठरला. चौथ्या सामन्यात कोल्हापूर पोलिस संघाने ईश्वरपूरच्या निशिकांतदादा फाउंडेशनला ३-१ असे हरवून आगेकूच केली. कोल्हापूरच्या सत्यजित सावंत, विनोद मनुगडे, मुकूंद रजपूत यांनी प्रत्येकी एक गोल मारला. ईश्वरपूरच्या स्वप्निल पाटीलचा गोल संघाचा पराजय टाळू शकला नाही.
चौकट...
आजचे सामने
- तिरंगा स्पोर्टस् , नूल विरुद्ध महाराष्ट्र क्रीडा मंडळ, इचलकरंजी. स. ८ वा.
- मुंबई पोलिस विरुद्ध कोल्हापूर पोलिस. स. ९.०० वा.
- अंतिम सामना दु. ३ वा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.