चावराई विद्यालयाची प्रगती कौतुकास्पद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चावराई विद्यालयाची प्रगती कौतुकास्पद
चावराई विद्यालयाची प्रगती कौतुकास्पद

चावराई विद्यालयाची प्रगती कौतुकास्पद

sakal_logo
By

07960
चावरे : येथील चावराई माध्यमिक विद्यालयात चावराई हस्तलिखिताचे प्रकाशनप्रसंगी बाबासाहेब सिद, व्ही. बी. कुंभार, संपतराव तांबवेकर, जगन्नाथ पाटील, माणिकराव निकम, सुशांत मोहिते, अमरसिंह पाटील, संजय पाटील आदी उपस्थित होते.
-------------
चावराई विद्यालयाची प्रगती कौतुकास्पद
बाबासाहेब सिद; प्रशालेच्या हस्तलिखित प्रकाशन, पारितोषिक वितरण
घुणकी, ता. २३ : चावराई माध्यमिक विद्यालयाने केलेली शैक्षणिक प्रगती कौतुकास्पद आहे. तसेच शैक्षणिक वर्षात विविध उपक्रम राबवून शाळेने गरुडझेप घेतली असल्याचे मत पारगाव केंद्रप्रमुख बाबासाहेब सिद यांनी चावरे येथे व्यक्त केले.

चावरे (ता. हातकणंगले) येथील चावराई माध्यमिक विद्यालयात ''चावराई हस्तलिखित''प्रकाशन, वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण, जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळाचा वर्धापन दिन, सांस्कृतिक कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी हातकणंगले खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष जगन्‍नाथ पाटील होते.
वाढदिवसानिमित्त सानिका पाटील हिने विद्यालयास पुस्तक भेट दिले. ९० टक्‍क्यांहून अधिक गुण प्राप्त केलेल्या साक्षी मानसिंग पाटील हिला माजी विद्यार्थी सुशांत सुरेश पाटील, ओंकार पाटील यांच्याकडून २५०० रुपयांचे बक्षीस दिले. नववीच्या विद्यार्थ्यांनी बाळशास्त्री जांभेकर यांची प्रतिमा भेट दिली.
चावराई हस्तलिखिताचे प्रकाशन, वर्धापन दिन, वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण झाले. किणी हायस्कूलचे अध्यापक व्ही. बी. कुंभार, सानिका पाटील, समृद्धी निकम यांनी मनोगत व्यक्त केले. सुशांत मोहिते, अमृता पाटील, मनीषा कोरे, भानुदास काशीद, एकनाथ धनवडे, अक्षय धोंगडे यांचा सत्कार केला. सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्‍घाटन शारदा गुरव, आशा धनवडे, विद्यामंदिरच्या मुख्याध्यापिका अनुपमा चव्हाण, अध्यापिका आशा मुरुगुटे, रूपाली निकम, संजय पाटील यांच्याहस्ते झाले. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी समूहगीत, नृत्य, नाटिका सादर केल्या. हळदी-कुंकू समारंभात महिलांना भेटवस्तू दिल्या. माणिकराव निकम, श्रीकांत धनवडे, दीपकराव शिंदे, प्रकाश पाटील, रमेश पवार, सुरेश पाटील, अमरसिंह पाटील, संपत पचिंबरे आदी उपस्थित होते. एस. ए. पाटील यांनी स्वागत केले. मुख्याध्यापक एस. एस. पाटील यांनी वर्षभरातील उपक्रमांचा आढावा घेतला. अध्यापिका ए. वाय. पाटील, विजय यादव (कोल्हापूर), सौ. जे. एस. कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. अध्यापक एस. एस. जाधव यांनी आभार मानले.
----
सुशांत मोहितेचा सत्कार
सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) घेण्यात आलेल्या निवडणुकीत तळसंदे येथील कॉमर्स ॲण्ड मॅनेजमेंट, डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापीठात अध्यक्षपदी सुशांत मोहिते (चावरे) यांची निवड झाल्याबद्दल सत्कार केला.