घुणकीत शुक्रवार वार पासून राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

घुणकीत शुक्रवार वार पासून राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा
घुणकीत शुक्रवार वार पासून राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा

घुणकीत शुक्रवार वार पासून राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा

sakal_logo
By

घुणकीत उद्यापासून राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा
घुणकी, ता. ९ : येथील चॅलेंजर्स स्पोर्ट्स क्लबच्या बाराव्या वर्धापन दिनानिमित्त ''छत्रपती शिवाजी महाराज चषक'' राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा शुक्रवार (ता. १०) पासून होणार असल्याची माहिती संयोजक वारणा सहकारी साखर कारखान्यांचे संचालक सुभाष जाधव, चॅलेंजर्स स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष सुहास शिंदे, उपाध्यक्ष विकास जाधव, सचिव संजय सिद, सहसचिव संतोष पाटील, खजिनदार सुधीर पोवार यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराज चषक स्पर्धेत राष्ट्रीय व राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धा होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन वारणा समूहाचे नेते आमदार विनय कोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदचे माजी सदस्य अशोकराव माने, उद्योगपती नीरज झंवर, संजीवन नाॅलेज सिटीचे संस्थापक पी. आर. भोसले यांच्या उपस्थितीत होणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील विजेत्यांना ३० हजार रुपये, २५ हजार रुपये,२० हजार रुपये व उत्तेजनार्थ ५ हजार रुपये व चषक दिले जातील. तर राज्यस्तरीय स्पर्धेतील विजेत्यांना ११ हजार, ७ हजार, ५ हजार रुपये व चषक दिले जाईल. तसेच बेस्ट प्लेअर, बेस्ट शूटर यांनाही पारितोषिक दिले जाणार आहेत. पारितोषिक वितरण खासदार धैर्यशील माने, जनसुराज्य चे प्रदेशाध्यक्ष समीत कदम, राष्ट्रीय नेमबाज संजय पाटील, युवा उद्योजक शरद बेनाडे, प्रीतम पाटोळे यांच्या उपस्थितीत होणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेत विविध राज्यांतील ८ संघ तर राज्यातील १२ संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धा दिवसा व रात्री प्रकाशझोतात होणार आहेत.