
प्रसाद जाधवच्या उपकरणाची निवड
प्रसाद जाधवच्या
उपकरणाची निवड
घुणकी, ता.१२: वाठार (ता.हातकणंगले) येथे झालेल्या सुवर्ण महोत्सवी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनामध्ये पाराशर हायस्कूलचा विद्यार्थी प्रसाद जाधव याच्या स्मार्ट हेल्मेट या उपकरणाला प्रथम क्रमांक मिळाला. त्याची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे. शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्याहस्ते सन्मानचिन्ह देऊन प्रसादला गौरवले.
हेल्मेट घातले तरच गाडी सुरू होते. मद्यप्राशन करून हेल्मेट घातले तर अलार्म वाजतो. गाडी चालवत असताना झोप लागली तर अलार्म वाजतो. गाडी चोरी झाली तर लोकेशन समजते, अशी विविध वैशिष्ट्ये असलेले हेल्मेट प्रसादने तयार केले आहे. प्रसाद आठवीत शिकत आहे. त्याला विज्ञान विभाग प्रमुख स्वाती कोकितकर, विनायक कोकितकर यांनी मार्गदर्शन केले. संध्याराणी माने अभय शेलार, विनायक मेथे पाराशरचे प्राचार्य शशिकांत काटे, पर्यवेक्षक माणिक कुरुंदवाडे यांचे सहकार्य लाभले.