वाईट नजरेने पाहण्याचा कारणावरून पाडळीत एकास मारहाण: | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाईट नजरेने पाहण्याचा कारणावरून पाडळीत एकास मारहाण:
वाईट नजरेने पाहण्याचा कारणावरून पाडळीत एकास मारहाण:

वाईट नजरेने पाहण्याचा कारणावरून पाडळीत एकास मारहाण:

sakal_logo
By

वाईट नजरेने पाहण्याच्या
कारणावरून एकास मारहाण

घुणकी: पाडळी(ता. हातकणंगले) येथे घरातील महिलेकडे वाईट नजरेने पाहण्याच्या कारणावरून सुजित सदाशिव माने (रा.पाडळी) याच्यावर कोयत्याने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. या घटनेची नोंद पेठवडगाव पोलिसांत झाली असून, याप्रकरणी तानाजी म्हाकू माने, प्रकाश तानाजी माने, विकास तानाजी माने (सर्व रा.पाडळी) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. जखमी सुजित माने आणि संशयित आरोपी तानाजी माने हे चुलतभाऊ आहेत. दरम्यान, फिर्यादी सुजित माने हा बिरदेव मंदिराजवळ शेळ्यांना घेऊन आला असताना प्रकाश माने याने आमच्या घरातील महिलेकडे वाईट नजरेने का पाहतोस, असा जाब विचारत अर्वाच्य शिवीगाळ केली. तसेच तानाजी माने आणि विकास माने यांनी सुजित मानेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. प्रकाश माने याने हातातील लोखंडी कोयत्याने सुजित याच्या हातावर वार केले. यामध्ये सुजित गंभीर जखमी झाला. याप्रकरणी तिघांवर मारहाणीचा गुन्हा दाखल झाला असून, अधिक तपास हवालदार पतंगराव रेणुशे करीत आहेत.
-----