रद्द केलेले ८०० सभासद मतदानास पात्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रद्द केलेले ८०० सभासद मतदानास पात्र
रद्द केलेले ८०० सभासद मतदानास पात्र

रद्द केलेले ८०० सभासद मतदानास पात्र

sakal_logo
By

रद्द केलेले ८०० सभासद मतदानास पात्र
---
जिल्हा उपनिबंधकांचा निर्णय; तळसंदेतील जय भारत सेवा संस्था
---
घुणकी, ता. २० : तळसंदे (ता. हातकणंगले) येथील जय भारत विकास सेवा संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी प्रसिद्ध झालेल्या प्रारूप मतदार सभासद यादीतून माजी सरपंच दौलतराव मोहिते व बाबासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी गटाने विरोधकांची ८०० नावे वगळली होती. विरोधी गटाचे सभासद शिवाजी पाटील, किरण साळवी, धनाजी चव्हाण यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे वेगवेगळ्या तक्रारी दाखल केल्या होत्या. या तक्रारीची दखल घेत जिल्हा उपनिबंधकांनी रद्द केलेल्या सभासदांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवला आहे.
याबाबत विरोधी गटाचे नेते व संस्थेचे माजी अध्यक्ष हौसेराव पाटील म्हणाले, की जय भारत विकास संस्थेची निवडणुकीसाठी प्रारूप मतदार यादी जाहीर झाली होती. सत्ताधारी मंडळींनी राजकीय द्वेषातून बेकायदेशीरपणे सुमारे ८०० सभासदांची नावे यादीतून कमी केली होती. मर्जीतील थकबाकीदार सभासदांची नावे पात्र यादीत ठेवली होती. विरोधी गटातील थकबाकीदार सभासदांची नावे अपात्र यादीत ठेवली होती. नवीन वाढीव सभासद केले आहेत. याबाबत जिल्हा उपनिबंधक कोल्हापूर यांच्याकडे हरकती दाखल केल्या. जिल्हा उपनिबंधक यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था समिती निवडणूक नियम २०१४ चे नियम ११ (३) नुसार सन २०१५ मध्ये यादीत नमूद असलेल्या सर्व सभासदांची नावे रीतसरपणे संस्थेने समाविष्ट करावीत. यादीत मृत व थकबाकीदारांची नावे समाविष्ट करू नयेत, असाही निर्णय दिला. सभासदत्व कायम राहिल्याने शेतकऱ्यांना संस्थेमार्फत शेतीसाठी कर्ज घेणे व कोल्हापूर जिल्हा बँकेच्या शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या नवनवीन योजनांचा लाभ घेण्यासाठी फायदा होणार आहे.
-----
संस्थेचे माजी अध्यक्ष शिवाजी पाटील व अन्य ५२ जणांचा एक हरकत अर्ज मंजूर केला असताना पुन्हा त्यांनी दिलेला दुसरा हरकत अर्जही मंजूर केला. त्यामुळे निर्णय बदलून एक हजार २३३ सभासद घ्यावेत, असा जिल्हा उपनिबंधकांनी दिलेला निर्णय अन्यायकारक आहे. हा निर्णय रद्द करावा अन्यथा जिल्हा उपनिबंधकांविरुद्ध लोकायुक्त व उच्च न्यायालयात दाद मागणार आहे.
- महादेव यशवंत भोसले, तक्रारदार सभासद