Sat, March 25, 2023

अपघात
अपघात
Published on : 26 February 2023, 6:43 am
08111
वाठार: येथे ट्रक पलटी झाल्याने रस्त्यावर पसरलेल्या लाकडी फळ्या.
...
वाठारजवळ टायर फुटल्याने ट्रक उलटला
घुणकी, ता.२६: पुणे -बंगळूर महामार्गावरील वाठार तर्फ वडगाव (ता. हातकणंगले) येथे कर्नाटकहून पुण्याच्या दिशेने जाणारा ट्रक उलटल्याने चालक जखमी झाला. तर ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेची नोंद पेठवडगाव पोलिसांत झाली आहे.
दुपारी चारच्या सुमारास कर्नाटकहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकचा (के.ए.२७.बी.२२२२) पुढील बाजूचा टायर फुटल्याने चालकाचा ताबा सुटून उड्डाणपुलाच्या उताराला एका हॉटेलसमोर ट्रक उलटला. या वेळी ट्रकमधील लाकडी पट्ट्या महामार्गावर पडल्याने वाहतूक खोळंबली. हवालदार आर. ए पाटील, कृष्णात पाटील यांनी जेसीबीच्या मदतीने लाकडी पट्ट्याचा ढीग बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
----