‘डी. वाय. पाटील कृषी’ ला सुवर्णपदक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘डी. वाय. पाटील कृषी’ ला सुवर्णपदक
‘डी. वाय. पाटील कृषी’ ला सुवर्णपदक

‘डी. वाय. पाटील कृषी’ ला सुवर्णपदक

sakal_logo
By

08119
तळसंदे : सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांना डॉ. के. प्रथापन, डॉ. जे. ए. खोत, डॉ. संग्राम पाटील, प्रा. कुंभार आदिंनी सन्मानित केले.
-----
‘डी. वाय. पाटील कृषी’ ला सुवर्णपदक
राष्ट्रीय शोध शिखर प्रकल्प स्पर्धा; अंधांसाठी बनवली काठी
घुणकी, ता. २७ : राष्ट्रीय शोध शिखर प्रकल्प स्पर्धेत तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डी. वाय. पाटील कृषी व तंत्र विद्यापिठाच्या द्वितीय वर्ष कॉम्प्युटर सायन्स अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक व १५ हजारांचे बक्षीस पटकावले. भोपाळ येथील रवींद्रनाथ टागोर विद्यापिठाने स्पर्धा आयोजित केली होती. ईशा खटावकर, आदित्य आपटे, केदार पवार या विद्यार्थ्यांनी सेन्सर व आर्डिनो तंत्रज्ञानाचा वापर करत अंधांसाठी बनवलेल्या अनोख्या काठीसाठी विद्यापिठाला हा बहुमान मिळाला आहे.
‘थर्ड आय फॉर ब्लाइन्ड’ ही कल्पना घेऊन विद्यार्थ्यांनी अंध व्यक्तींना मदत म्हणून एक अनोखी काठी बनवली आहे. यामध्ये सेन्सर व आर्डिनो तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. यामध्ये अंध व्यक्तींना कोणाचीही मदत न घेता काठीच्या साह्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता येते. या स्पर्धेसाठी भारतातून ३५० हून अधिक प्रकल्प आले होते. कुलगुरू डॉ. के. प्रथापन म्हणाले,‘विद्यापीठात फक्त पुस्तकी ज्ञान न देता अनुभवात्मक शिक्षणाची संकल्पना राबवली जात आहे.’ कुलसचिव डॉ. जे. ए. खोत म्हणाले,‘विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत व स्टाफने दिलेले योगदान याच्या जोरावरच हे यश संपादन करता आले.’ असोसिएट डीन डॉ. संग्राम पाटील म्हणाले,‘विद्यार्थ्यांनी हा प्रकल्प हाती घेऊन जिद्द, मेहनत व चिकाटी यांच्या जोरावर तो प्रकल्प पूर्णत्वास नेला. प्रकल्पासाठी प्रा. अरिफ शेख, प्रा. एस. ए. कुंभार, प्रा. प्रीतम महाजन यांचे मार्गदर्शन लाभले.