
वाठारमध्ये विकासकामांचा प्रारंभ
08195
वठार तर्फे वडगाव: येथील गटर्सच्या प्रारंभप्रसंगी आमदार राजूबाबा आवळे, तेजस्विनी वाठारकर, राहूल पोवार, सूर्यकांत शिर्के, सुहास पाटील, महेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.
------
वाठारमध्ये विकासकामांचा प्रारंभ
घुणकी ः वाठारच्या उर्वरित समस्यांचे वर्षभरात निराकरण केले जाईल, अशी ग्वाही आमदार राजूबाबा आवळे यांनी यांनी दिली. वठार तर्फे वडगाव येथील पंधराव्या वित्त आयोगाच्या योजनेतून दत्त मंदिर रोड गाव विहीर ते गणेश मंदिर दरम्यानच्या पाण्याची पाईपलाईन कामाचे उदघाटन, गणेश मंदिर ते पृथ्वी हायस्कूल गटर्स बांधकामप्रसंगी ते बोलत होते. कामांचे उद्घाटन माजी उपसरपंच सूर्यकांत शिर्के यांच्याहस्ते झाले. वारणा दूध संघाचे संचालक महेंद्र शिंदे, सरपंच तेजस्विनी वाठारकर, उपसरपंच राहुल पोवार, ग्रामपंचायत सदस्य सुहास पाटील, अश्विनी कुंभार, सचिन कुंभार आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत सदस्य महेश शिर्के यांनी स्वागत केले.