उसाला प्रतिटन पाच हजार रुपये भाव पाहिजेच

उसाला प्रतिटन पाच हजार रुपये भाव पाहिजेच

08262
घुणकी : जय शिवराय किसान संघटनेच्या सभेत शिवाजीराव माने यांनी मार्गदर्शन केले. पांडुरंग जाधव, मारुती पाटील, शिवाजीराव शिंदे, रावसाहेब ऐतवडे, उदयसिंह पाटील, शितल कांबळे आदी उपस्थित होते.
----------
उसाला प्रतिटन पाच हजार रुपये भाव पाहिजेच

शिवाजीराव माने; घुणकी येथे ‘जय शिवराय’तर्फे जनजागृती अभियान सभा
घुणकी, ता. १०: ऊसाचा एकरी उत्पादन खर्च चार वर्षापेक्षा ७० टक्यांनी वाढल्यामुळे ऊसाला आजचा दर ३००० रुपये आहे. त्यामध्ये ७० टक्के महागाई निर्देशांक लागू केला असता तर प्रति टन ५१०० रुपये भाव मिळायला पाहिजे होता. त्यामुळे ऊसाला प्रतिटन ५००० रुपये भाव मिळालाच पाहिजे, असे मत जय शिवराय किसान संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव माने यांनी येथे व्यक्त केले.
शेतकरी विरोधी कायदे रद्द करा व उसाला पाच हजार रुपये भाव मिळाला पाहिजे, या जनजागृती अभियानाबाबत श्री. माने बोलत होते. ऊस दर अभियान समितीचे निमंत्रक रावसाहेब ऐतवडे म्हणाले, ‘देशाच्या १४० कोटी जनतेला पुरवूनही अन्नधान्य निर्यात करण्यासाठी धडपडत असलेल्या शेतकऱ्याला कर्जमुक्ती एकदाच करावी व वाढीव वीज बिले रद्द करून, दिवसा बारा तास वीज द्यावी.’ ग्रामपंचायत सदस्य शिवाजी सिद, माजी सदस्य पांडुरंग जाधव, जयवंत जाधव, शरद मगदूम, संजय पवार, प्रताप मोरे, अशोक बुढ्ढे, उदयसिंह पाटील, श्री. खाडीलकर, शितल कांबळे (सांगली) उपस्थित होते. माजी उपसरपंच मारुती पाटील यांनी स्वागत केले. जय शिवरायचे उपाध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com