किणी येथे १० मे पासून पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव

किणी येथे १० मे पासून पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव

किणी येथे १० मे पासून
पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सव
घुणकी, ता. २: किणी (ता. हातकणंगले) येथील कुंथुनाथ जिनमंदीर मानस्तंभांच्या द्विद्वादश वर्षपूर्ती व मल्लिनाथ मंदिराच्या नूतन मानस्तंभातील मूर्ती प्रतिष्ठापनेनिमित बुधवारी (ता.१० ) ते मंगळवारी (ता. १६ ) अखेर पंचकल्याण प्रतिष्ठा महामहोत्सवाचे आयोजन केले आहे.
किणी येथील श्री १००८ मल्लिनाथ मंदिरासमोर कुमार जिनगोंडा पाटील यांनी मानस्तंभ बांधून त्यातील भगवंतांची प्रतिमाही दिल्या आहेत. त्यांची प्राणप्रतिष्ठापणा तसेच कुंथुनाथ मंदिरासमोरील मानस्तंभाच्या द्वादशवर्षपूर्ती व मूलनायक कुंथुनाथ भगवंतांच्या नवीन पंचधातु मूर्तीची प्राणप्रतिष्ठापणा या पंचकल्याण महामहोत्सवात होणार आहे. नांदणी मठाचे जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी यांच्या अधिनेतृत्वात व आचार्य श्री १०८ जिनसेन महाराज व प. पू. १०५ आर्यिका सक्षममती माता यांच्या सानिध्यात होणाऱ्या महोत्सवाच्या सौधर्म इंद्र इंद्रायणी(यजमानपद) होण्याचा मान अमोल व समिक्षा चौगुले या दाम्पत्यास मिळाला आहे.
बुधवारी (ता. १० ) ध्वजवंदनाने महामहोत्सवाची सुरवात होणार आहे. गुरुवारी (ता. ११) गर्भकल्याणक महोत्सव (पूर्वार्ध), शुक्रवारी (ता.१२) गर्भकल्याणक (उत्तरार्ध), शनिवारी (ता. १३ ) जन्मकल्याणक महोत्सव, रविवारी (ता. १४) तप कल्याणक महोत्सव व मौजीबंधन, दीक्षाकल्याणक व राज्याभिषेक, सोमवारी (ता. १५) केवलज्ञान कल्याणक व रथोत्सव, मंगळवारी (ता.१६) मोक्षकल्याणक व १००८ कलशांचा अभिषेक होऊन महोत्सवाची सांगता होईल. या काळात दररोज दुपारी त्यागीगणांचे प्रवचन, रात्री संगीत आरती होईल. प्रतिष्ठाचार्य म्हणून अनिल कलाजे काम पाहणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com