विद्यार्थ्यांनी टेरारियम व्यवसायाकडे वळावे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्यांनी टेरारियम व्यवसायाकडे वळावे
विद्यार्थ्यांनी टेरारियम व्यवसायाकडे वळावे

विद्यार्थ्यांनी टेरारियम व्यवसायाकडे वळावे

sakal_logo
By

08562
तळसंदे: विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेले फुलांचे वेगवेगळे पुष्पगुच्छ व टेरारियम सोबत महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापक व विद्यार्थी.
----
विद्यार्थ्यांनी टेरारियम व्यवसायाकडे वळावे
संगीता सावर्डेकर; डीवायपी कृषी महाविद्यालयात दिवशीय कार्यशाळा
घुणकी, ता.१ : विद्यार्थ्यांनी यावेळी टेरारियम बनवण्याचा अनुभव घेऊन फुलांचे पुष्पगुच्छ व टेरारियम या व्यवसायाकडे वळून चांगला फायदा मिळवावा, असे आवाहन कोल्हापूर येथील गार्डन डीझायनर संगीता सावर्डेकर यांनी केले.
तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयात दोन दिवशीय पुष्पगुच्छ व टेरारियम बनवण्याची कार्यशाळा झाली. यावेळी सावर्डेकर यांनी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी त्यांनी विद्यार्थ्यांना फुलांचे वेगवेगळे प्रकार, त्यांची नावे, पुष्पगुच्छ बनवण्यासाठी लागणारे साहित्य, विविध देशामधील पुष्पगुच्छ (मोरीबाना, इकेबाना, मोरीमोनो ई.) तसेच कोरड्या फुलांचे पुष्गुच्छ याबाबत माहिती दिली. या कलेपासून निर्माण होणाऱ्या व्यवसायाचा गृहिणी महिलांसाठी होणारा फायदा याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही स्वतः पुष्पगुच्छ बनवण्याचा आनंद घेतला.
दुसऱ्या दिवशी सावर्डेकर यांनी विद्यार्थ्यांना टेरारियम, काचेच्या भांड्यामध्ये शोभिवंत झाडांचे व रंगीत वाळूचे सुशोभीकरण कसे करावे याबद्दल माहिती दिली. वेगवेगळ्या प्रकारची काचेची भांडे, वेगवेगळे रंगीत दगड व वाळू, कुलंट वनस्पती, सूक्ष्म खेळणी व टेरारियमसाठी लागणारे साहित्य यामाध्यमातून रोजगार निर्मिती याबाबत माहिती दिली.
कार्यशाळेसाठी संस्थेच्या तळसंदे फार्ममधील शोभिवंत वनस्पती वापरल्या. कार्यक्रमासाठी प्राचार्य प्रा. डी. एन. शेलार, ॲकॅडमिक इन्चार्ज प्रा. आर. आर. पाटील, डी. वाय. पाटील ग्रुपचे हेड फार्म ऑपरेशन ए. बी. गाताडे यांचे मार्गदर्शन मिळाले. कार्यशाळेचे नियोजन प्रक्रिया विषय शिक्षक प्रा. एस. एल. राऊत व उद्यानविद्या विभागाचे प्रमुख डॉ. एन. आर. कडगे यांनी केले. संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज संजय पाटील, कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता यांचे प्रोत्साहन लाभले.