डॉ.यास्मिन पिरजादे व प्रिया घाटगे अहिल्यादेवी होळकर पुरस्कारानी सन्मानित

डॉ.यास्मिन पिरजादे व प्रिया घाटगे अहिल्यादेवी होळकर पुरस्कारानी सन्मानित

08564
नवे पारगाव: अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने डॉ. यास्मिन पिरजादे व प्रिया घाटगे यांचा सन्मान केला.
-----------------------
डॉ. पिरजादे, घाटगे यांना अहिल्यादेवी होळकर पुरस्कार
घुणकी, ता. १: ग्रामपंचायत स्तरावर अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान हा शासन स्तरावरील घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. यामुळे ग्रामीण भागातील कर्तबगार महिलांना मिळालेले पुरस्कार त्यांना भाविष्यातील त्यांच्या भरीव सामाजिक कार्यासाठी प्रेरणादायी ठरतील, असे प्रतिपादन नवे पारगांवच्या सरपंच वर्षाराणी देशमुख यांनी केले.
नवे पारगाव (ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्यावतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधत गांवातील सामाजिक व आरोग्यसेवेत योगदान दिलेल्या डॉ. यास्मिन शरीफुद्दिन पिरजादे व महीलांसाठी योगा प्रशिक्षणाद्वारे त्यांचे आरोग्य सुदृढ ठेवणाऱ्या प्रिया घाटगे यांचा ‘अहिल्यादेवी पुरस्कार’ देऊन सन्मानीत केले. डॉ. यास्मिन पिरजादे, प्रिया घाटगे, माजी सरपंच प्रकाश देशमुख, डॉ. शरीफुद्दिन पिरजादे आदींनी मनोगत व्यक्त केले. वारणा दुध संघाचे संचालक प्रदीप देशमुख, बाळासो बंडगर, उपसरपंच राम जाधव, पांडूरंग सिद, आर. व्ही. डोईजड आदी उपस्थित होते. माजी सरपंच संदीप कांबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. ग्रामपंचायत सदस्य अमोल शिंदे यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com