सुधारीत बातमी तळसंदेत अनैतिक संबंधावरुन हाणामारी; पाच जणांवर गुन्हा दाखल संबंधित युवकाच्या विवाहादिवशीच दोन्ही कुटुंबात वाद

सुधारीत बातमी तळसंदेत अनैतिक संबंधावरुन हाणामारी; पाच जणांवर गुन्हा दाखल संबंधित युवकाच्या विवाहादिवशीच दोन्ही कुटुंबात वाद

तळसंदेत हाणामारी; पाच जणांवर गुन्हा
घुणकी, ता. ११ : युवकाच्या विवाहादिवशीच मुलाचा संसार मोडून लग्न करतोयस, अशी विचारणा करणाऱ्या कुटुंबाला युवकाकडील जमावाने मारहाण केली. याची फिर्याद विवाहितेच्या सासूने दिली असून, पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी घडली. घटनेची नोंद वडगाव पोलिसात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी पीडित महिलेच्या सुनेचे तळसंदे येथील तानाजी बाजीराव मोकाशी याच्याशी अनैतिक संबंध होते. यामुळे फिर्यादीच्या सुनेला मुलाने घटस्फोटासाठी कोल्हापूर न्यायालयात दावा दाखल आहे. तेव्हापासून या दोनही कुटुंबांत वाद सुरू होते. दरम्यान, तानाजी मोकाशी याचा विवाह होणार असल्याचे फिर्यादी कुटुंबियांना समजले. या कुटुंबातील लोकांनी मोकाशी कुटुबिंयांशी वाद घातला. यामध्ये मोकाशी बंधूंनी फिर्यादी कुटुंबियांना लाथा-बुक्क्यांचा मार दिल्याने ते जखमी केले.
याप्रकरणी धनाजी बाजीराव मोकाशी, तानाजी बाजीराव मोकाशी, आनंदा गणू मोकाशी, संतोष शिवाजी वडर, सागर शिवाजी वडर (रा. सर्व तळसंदे. ता. हातकणंगले) या पाचजणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक विलास भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पोतदार अधिक तपास करीत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com