आमदार राजू आवळे यांचा वाठारला सत्कार

आमदार राजू आवळे यांचा वाठारला सत्कार

Published on

10263
वाठार : आमदार राजू आवळे यांच्या सत्कारप्रसंगी डॉ. अरुण केशव शिर्के, सूर्यकांत शिर्के, सुहास पाटील, महेश शिर्के, आनंदा शिंदे आदी.
-----
आमदार राजू आवळे
यांचा वाठारला सत्कार
घुणकी, ता. ८ : वाठार (ता. हातकणंगले) येथील विकासासह मंदिराच्या जीर्णोद्धारास निधी दिल्याबद्दल आमदार राजू आवळे यांचा सत्कार केला.
पाच वर्षांमध्ये रस्ते, गटारे, त्यानंतर देवस्थानांचा जीर्णोद्धार अशा पद्धतीने वाठारला निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल तसेच ग्रामपंचायत सदस्य महेश शिर्के यांच्या विशेष प्रयत्नातून प्रभाग दोनमध्ये आमदार आवळे यांनी भरघोस निधी उपलब्ध करून दिला. गावातील काँग्रेसप्रेमी कार्यकर्त्यांतर्फे गणेश मंदिरात आमदार आवळे यांचा सत्कार केला. ग्रामपंचायत सदस्य महेश शिर्के, माजी सरपंच नारायण कुंभार, ग्रामपंचायत सदस्य सुहास पाटील, अश्विनी कुंभार, डॉ. अरुण शिर्के, दत्तात्रय शिर्के, के. पी. कुंभार, महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक आनंदा शिंदे, माजी ग्रामपंचायत सदस्य जावेद कुरणे, मोहसीन पोवाळे, भरारी बचत गटाच्या अध्यक्षा मधुरा शिर्के, सुचित्रा शिर्के उपस्थित होत्या. माजी उपसरपंच सूर्यकांत शिर्के यांनी स्वागत केले. ग्रामपंचायत सदस्य महेश श्रीकृष्ण शिर्के यांनी आभार मानले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.