दुग्ध व्यवसायामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती

दुग्ध व्यवसायामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती

Published on

10265
गोकुळ शिरगाव ः चर्चासत्रात शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. एम. पी. पाटील. व्यासपीठावर मान्यवर.
-----
दुग्ध व्यवसायामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती
डॉ. एम. पी. पाटील ः ‘डीवायपी’ कृषी महाविद्यालयातर्फे चर्चासत्र
सकाळ वृत्तसेवा
घुणकी, ता. ९ : ‘दुग्ध व्यवसाय हा ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणारा आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे मागणीच्या तुलनेत दुधाचा पुरवठा कमी आहे. तेव्हा आगामी काळात दूध उत्पादनाची मोठ्या प्रमाणात आवश्‍यकता भासणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी दूध उत्पादनामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, तसेच गोठ्यामध्ये जातिवंत जनावरांचे संगोपन करावे,’ असे प्रतिपादन ‘गोकुळ’चे प्रशिक्षण अधिकारी डॉ. एम. पी. पाटील यांनी केले.
तळसंदे (ता. हातकणंगले) येथील डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालयातर्फे ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथे आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. ‘दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन’ या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डी. एन. शेलार होते. ‘गोकुळ’चे संचालक बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील-चुयेकर, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, नंदकुमार डेंगे, गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे, साताप्पा कांबळे आदी उपस्थित होते. महाविद्यालयाचे शिक्षण प्रभारी प्रा. आर. आर. पाटील, कार्यक्रम समन्वयक डॉ. एस. एम. घोलपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. वाय. व्ही. पाटील यांनी मार्गदर्शन केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.