हिम्मतबहाद्दर चव्हाण चषक कबड्डी स्पर्धा

हिम्मतबहाद्दर चव्हाण चषक कबड्डी स्पर्धा
Published on

10969
किणी : येथील कबड्डी स्पर्धेतील ६०किलो गटातील विजेत्या संघाला बक्षीस वितरण करताना विजयसिंह चव्हाण, माजी उपसरपंच संजय माने, दीपक घाटगे, अजित पाटील, बाळासाहेब निकम आदी.
.....
लोगो ः हिम्मतबहाद्दर चव्हाण चषक कबड्डी स्पर्धा

जय शिवराय क्रीडा मंडळ विजेता,
ओमसाई क्रीडा मंडळ उपविजेता

घुणकी, ता. ३ : किणी (ता. हातकणंगले) येथील हिम्मतबहाद्दर चव्हाण चषक कबड्डी स्पर्धेत ६० किलो वजनी गटात हेर्लेच्या जय शिवराय क्रीडा मंडळाने विजेतेपद, तर तळसंदेच्या ओमसाई क्रीडा मंडळाने उपविजेतेपद पटकावले.
येथील किणी विद्यार्थी मंडळाच्यावतीने ७०व्या हिम्मतबहाद्दर चव्हाण चषक कबड्डी स्पर्धा पार पडल्या. ६० किलो वजनी गटातील अंतिम सामना हेर्लेच्या जय शिवराय क्रीडा मंडळ विरुद्ध तळसंदेच्या ओमसाई क्रीडा मंडळ यांच्यात चुरशीचा होऊन जय शिवरायने अवघ्या ३ गुणांनी सामना जिंकून हिम्मतबहाद्दर चव्हाण चषकावर नाव कोरले. त्यामुळे ओमसाईला उपविजेतेपद मिळाले. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या इचलकरंजीच्या बालभारत व सडोलीच्या मावळा क्रीडा मंडळाला तिसरा क्रमांक विभागून दिला.
यावेळी वारणा दूध संघांचे संचालक राजवर्धन मोहीते यांनी भेट दिली. विजेत्या संघाला विजयसिंह चव्हाण (हिम्मतबहाद्दर), माजी उपसरपंच संजय माने, अजित पाटील, दीपक घाटगे, शिवाजी चव्हाण, नारायण कुंभार, बी. एस. निकम, धीरज चव्हाण, ऋषीकेश घाटगे, अमित घोटवडे, राजेंद्र पोवार यांच्यासह कुस्तीशौकीन उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com