कणेरी वैद्यकीय अधिकाऱ्यांना खुलासा सादर करण्याचे आदेश..

कणेरी वैद्यकीय अधिकाऱ्यांना खुलासा सादर करण्याचे आदेश..

कणेरी वैद्यकीय अधिकाऱ्यांना
खुलासा सादर करण्याचे आदेश
सकाळ वृत्तसेवा
गोकुळ शिरगाव, ता. १४ : कणेरी (ता. करवीर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचा हलगर्जीपणा रविवारी (ता. १२) समोर आला. या पार्श्‍वभूमीवर तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उत्तम मदने यांनी या घटनेची पाहणी केली. यावेळी आरोग्य केंद्रात केवळ दोनच कर्मचारी उपस्थित असल्याचे निदर्शनास आले. याबाबत येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांना खुलासा सादर करण्याचे आदेश डॉ. मदने यांनी दिले आहेत.
यावेळी कुत्र्याने चावा घेतलेला रुग्ण आला होता, पण आरोग्य केंद्रात श्वानदंशावरील कोणत्याही प्रकारचे औषध उपलब्ध नव्हते. त्यानंतर डॉ. मदने यांनी स्वतः दखल देऊन दुसऱ्या आरोग्य केंद्रातून ही लस उपलब्ध करून त्या रुग्णास दिली.
दरम्यान, जे कर्मचारी हजेरीपत्रकावर आणि हालचाल रजिस्टरवर सही करत नाहीत किंवा त्यांच्या तपशिलाच्या नोंदी करत नाहीत, विहित वेळेत कार्यालयात उपस्थित नसतात, त्यांच्यावर कारवाई करावी. या कारवाईचा अहवाल कार्यालयास सादर करण्यात यावा. यापुढे प्राथमिक आरोग्य केंद्राकडील सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी शासकीय वेळेत कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत सक्त सूचना देण्यात याव्यात. या गोष्टीची माहिती घेऊन या घटनेबाबत दोन दिवसांच्या आत खुलासा करावा आणि याबाबतची माहिती संबंधित कार्यालयाला द्यावी, अशी नोटीस तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मदने यांनी कणेरी वैद्यकीय अधिकाऱ्यांना दिली आहे.
----------
कोट
ज्या लोकांनी त्यांच्या कामामध्ये चुका केलेल्या आहेत, शासकीय रुग्णालयातील कामे वेळेवर पूर्ण केलेली नाहीत, अशा सर्व घटकांची माहिती घेऊन त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल. पुन्हा असे प्रकार घडू नयेत त्यासाठी दक्षता घेतली जाईल.
- डॉ. उत्तम मदने, तालुका आरोग्य अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com