Fri, Feb 3, 2023

गारगोटी : आवश्यक आज कार्यक्रम
गारगोटी : आवश्यक आज कार्यक्रम
Published on : 8 January 2023, 4:47 am
गारगोटीत आज शेतकऱ्यांना पाणी परवाना वाटप
गारगोटी : भुदरगड तालुक्यातील दूधगंगा (काळम्मावाडी) प्रकल्पांतर्गत कूर उपकालवा व नागणवाडी लघुपाटबंधारे प्रकल्पातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना उद्या, सोमवारी पाणी उपसा परवान्यांचे वाटप होणार आहे. सकाळी अकरा वाजता येथील पाटबंधारे कार्यालयात हा कार्यक्रम होईल. आमदार प्रकाश आबिटकर प्रमुख उपस्थित असतील. कूर उपकालवा व नागणवाडी प्रकल्प उभारणीकरिता ज्या प्रकल्पग्रस्तांनी जमिनी दिल्या. त्याच शेतकऱ्यांना प्रकल्पाचे पाणी उपसा करण्याकरिता पाणी परवाने मिळत नव्हते. याकरिता आमदार आबिटकर यांनी पाटबंधारे विभागाची बैठक घेतली. याकामी कॅम्पचे आयोजन करण्याची सूचना केली. यातून ४५ शेतकऱ्यांना पाणी परवाने मंजूर केले आहेत.