
गारगोटी : अस्मिता कांबळे उपसरपंच
02744
गारगोटीच्या उपसरपंचपदी अस्मिता कांबळे
गारगोटी, ता. २१ : येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अस्मिता नारायण कांबळे यांची बिनविरोध निवड झाली. अध्यक्षस्थानी सरपंच संदेश भोपळे होते. उपसरपंच निवडीप्रसंगी आबिटकर यांच्या गटाचे सदस्य सर्जेराव मोरे यांनी व राष्ट्रवादीच्या सदस्या अस्मिता कांबळे यांनी अर्ज दाखल केले होता. मात्र श्री. मोरे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. येथे अस्मिता कांबळे यांना पहिल्या युवती उपसरपंच होण्याचा मान मिळाला.
तालुका संघाचे अध्यक्ष प्रा. बाळ देसाई, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश वास्कर, जयवंत गोरे, अलकेश कांदळकर, सचिन देसाई, आशाताई भाट, सुकेशनी सावंत, रूपाली कुरळे, सविता गुरव, स्नेहल कोटकर, मेघा देसाई, राहुल कांबळे, सविता गुरव, राहुल कांबळे, ग्रामसेवक संभाजी कांबळे, ग्रामसेवक तानाजी पाटील उपस्थित होते.