गारगोटी : | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गारगोटी :
गारगोटी :

गारगोटी :

sakal_logo
By

02780

शैक्षणिक कार्यासाठी
सरपंचपदाचे मानधन

बाळासाहेब जाधव ; प्राथमिक शाळेतर्फे सत्कार

गारगोटी, ता. ३ : पाच वर्षांतील सरपंचपदाचे मानधन शैक्षणिक कार्यासाठी प्राथमिक शाळेला देणार आहे, अशी घोषणा फणसवाडीचे सरपंच बाळासाहेब जाधव यांनी केली. विद्यामंदिर फणसवाडीच्यावतीने आयोजित कार्यक्रमांच्या उद्धघाटनप्रसंगी ते बोलत होते. गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे, तंटामुक्त अध्यक्ष सुशीलकुमार डवरी, उपसरपंच माया कांबळे प्रमुख उपस्थित होत्या.
सरपंच जाधव म्हणाले, ‘शैक्षणिक कार्याला भरीव रक्कम देणार आहे. विकासाचा रोडमॅप करून विकासकामे मार्गी लावीन. शैक्षणिक दर्जा उत्तम राहण्यासाठी विशेष लक्ष देऊ. मानधनातून आर्थिक मदत कमी पडत असेल तर आणखी मदतीच्या माध्यमातून शाळेचा दर्जा उंचावू.’ गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी, सरपंच जाधव यांच्या भूमिकेचे स्वागत केले. आनंदराव देसाई, प्रभाकर निंबाळकर यांनी मनोगत व्यक्त केले. शाळा समितीचे अध्यक्ष रोहन निंबाळकर, पोलिसपाटील प्रकाश कांबळे, उपसरपंच माया कांबळे, शिवाजीराव तोरसे, दत्तात्रय साळवी, सदाशिव गुरव, कृष्णा भारतीय, हिंदुराव साळवी, संदीप निंबाळकर, आशीष देसाई, सुदेश आस्वले, सुशांत कांबळे उपस्थित होते. मुख्याध्यापक शहाजी देसाई यांनी स्वागत, रवींद्र नागटिळे यांनी आभार मानले.