
गारगोटी : जलजीवन मिशन प्रशिक्षण
02859
शेणगाव : ग्रामस्तरीय क्षमता बांधणी प्रशिक्षणातील सहभागी पदाधिकाऱ्यांना प्रशस्तीपत्र देताना सरपंच सविता बारदेसकर व मार्गदर्शक.
जिल्ह्यात जलजीवन मिशन प्रशिक्षण सुरू
गारगोटी : केंद्र शासनाच्यावतीने जलजीवन मिशन हा प्रकल्प प्रायोगिक तत्वावर राबविला जात आहे. जिल्ह्यात या योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. यातील एक भाग म्हणून ग्रामस्तरीय क्षमता बांधणी प्रशिक्षण सुरू झाले आहे. प्रशिक्षणाकरिता जलशक्ती मंत्रालय केंद्र शासन, पाणी व स्वच्छता विभाग राज्य शासन, जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार मुख्य संसाधन संस्था मनवेल बारदेसकर एज्युकेशन सोसायटी गारगोटी यांच्यामार्फत हे प्रशिक्षण सुरू आहे. प्रत्येक ग्रामपंचायतीच्या पाच पदाधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले आहे. याचा लाभ प्रत्येक ग्रामपंचायतीने घ्यावा, असे आवाहन संस्थेचे कार्यकारी संचालक देवराज बारदेसकर यांनी केले आहे.