
गारगोटी : अपघातात एक ठार
मृत शहाजी खेगडे 02889
गारगोटीत टेम्पोच्या धडकेत एक ठार
गारगोटी, ता. २५ : येथील महावितरण कार्यालयानजीक मालवाहू टेम्पोने थाबंलेल्या दुचाकीस्वारास जोराची धडक देऊन गंभीर जखमी केले. डोक्यास गंभीर इजा झाल्यानंतर रक्तस्त्राव होऊन त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. शहाजी मारूती खेगडे (रा. पुष्पनगरपैकी खेगडेवाडी) असे मृताचे नाव आहे. अपघाताची भुदरगड पोलिसात नोंद झाली. पोलिसांनी टेम्पोचालक प्रसाद राजू कांबळे (रा. मार्केट यार्ड, जाधववाडी, कोल्हापूर) यास अटक केली.
पोलिसांनी सांगितले की, मालवाहू टेम्पो (एम एच ४६ इ २७५२) गारगोटीकडून गडिंग्लजकडे जात होता. यावेळी महावितरण कार्यालयानजीक टेम्पोने रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या शहाजी खेगडे यास जोराची धडक दिल्याने ते जागीच पडला. टेम्पो त्यांच्या अंगावरून गेल्याने डोक्याला गंभीर इजा झाली. त्याच्यावर ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केले. पुढील उपचारासाठी कोल्हापूरला नेत असताना त्यांचा वाटेत मृत्यू झाला. यावेळी त्याच्या बाजूला उभी असलेल्या दुचाकीलाही जोराची धडक दिल्याने दुचाकीचे नुकसान झाले. याबाबतची फिर्याद भास्कर दत्तात्रय सुर्वे (रा. मांगनूर, ता. कागल) यांनी दिली आहे. शहाजी खेगडे यांच्यामागे आई, वडील, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. शहाजी मजुरीचे काम करत होते.
ssociated Media Ids : GRG23B02889, GRG23B02890