राज्यातील प्राध्यापकांची पदे त्वरित भरावीत

राज्यातील प्राध्यापकांची पदे त्वरित भरावीत

शिक्षकाचे क्लिपार्ट टाकावे....
..........
राज्यातील प्राध्यापकांची पदे त्वरित भरावीत

नेट, सेट, पीएच.डी.धारक संघर्ष समितीची मागणी

सकाळ वृत्तसेवा
गारगोटी, ता. १४ : राज्यातील उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत येणारी प्राध्यापकांची हजारो पदे रिक्त आहेत. राज्य सरकारने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणीचे नियोजन केले आहे. मात्र, राज्यातील अनेक महाविद्यालयांत पूर्णवेळ प्राध्यापक नसल्याने नवे शैक्षणिक धोरण राबविणे अवघड आहे. यासाठी प्राध्यापक भरती करावी, अशी मागणी नेट, सेट, पीएच. डी.धारक संघर्ष समितीचे राज्य समन्वयक प्रा. जे. बी. सोरटे यांनी केली आहे. उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या सचिवांना याबाबतचा लेखी ई-मेल पाठविला आहे.
लोकसभा निवडणूक जाहीर होण्यापूर्वी शिक्षक भरतीचा पहिला टप्पा पूर्ण होऊन दुसरा टप्पा सुरू झाला आहे. मात्र, शासन फक्त प्राध्यापक भरतीचे गाजरच दाखवत आहे. वेळोवेळी घोषणा होऊनही आजतागायत प्राध्यापक भरती झालेली नाही. मागील दहा-बारा वर्षे भरती झाली नाही. यामुळे २०१७ पूर्वीच्या रिक्त पदांवर आजतागायत भरती सुरू आहे. २०१७ नंतरची हजारो पदे रिक्त आहेत. ती भरावीत, अशी मागणी संघटनेने केली आहे.
...
कोट...
राज्यातील सर्वाधिक वरिष्ठ महाविद्यालये तासिका तत्त्वावर (सीएचबी) काम करणाऱ्या प्राध्यापकांवर अवलंबून आहेत. त्यांना नऊ महिन्यांच्या करारावर तुटपुंज्या पगारावर राबवून घेतले जाते. जबाबदारीची अनेक शैक्षणिक कामे सोपविली जातात. कायमस्वरूपी नोकरीच्या आशेवर सर्वजण काम करीत आहेत. यामुळे शासनाने प्राध्यापक भरती प्रक्रिया सुरू करावी; अन्यथा उच्चशिक्षित बेरोजगारांच्या रोषाला सामोरे जावे लागेल.
- प्रा. जे. बी. सोरटे
राज्य समन्वयक, नेट, सेट, पीएच. डी. धारक संघर्ष समिती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com