महविद्यालय एकत्र निकाल

महविद्यालय एकत्र निकाल

महाविद्यालयनिहाय बारावीचा निकाल
०००००००००००००००००००

04432
मानसी कडाकणे
....
04433
सुमित भोसले
मानसी कडाकणे कला विभागात कागलमध्ये प्रथम
मुरगूड : मुरगूड विद्यालय ज्युनिअर कॉलेजच्या मानसी विकास कडाकणे हिने ९०.१७ टक्के गुण मिळवून कागल तालुक्यात कला विभागात प्रथम क्रमांक पटकावला. सुमित सागर भोसलेने विज्ञान विभागात ८३ टक्के गुण मिळवत केंद्रात द्वितीय क्रमांक पटकावला. मुरगूड विद्यालय हायस्कूल ज्युनिअर कॉलेजचा विज्ञान व वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के लागला. कला शाखेचा निकाल ९०.०७ टक्के, तर सरासरी निकाल ९५.४८ लागला. विज्ञान विभाग निकाल : सुमित सागर भोसले (८३), प्रथमेश दिलीप तांबेकर (८०.१७). कला विभाग : मानसी कडाकणे (९०.१७), अर्पिता समाधान परीट (७६.५०), प्राजक्ता पंडित कळमकर (७२.८३). वाणिज्य विभाग : गायत्री महादेव पोवार (७०.६७), संस्कार राजेश शहा (७०.५०), दीप्ती विक्रम शिंदे (६९.१७).
...............
04428
तनीषा जाधव
....
04429
अनघा अंगज
.....
04430
मनीषा गोते

शिवराज विद्यालयाचा निकाल ९५.५४ टक्के
मुरगूड : येथील शिवराज विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा बारावीचा निकाल ९५.५४ टक्के लागला. विज्ञान शाखा गुणानुक्रमे विद्यार्थी ः अनघा अनिल अंगज (८४.१७), अर्पिता युवराज पाटील (७९.५०), सुजल पांडुरंग गायकवाड (७९.१७). कॉमर्स ः मनीषा विठ्ठल गोते (८२.८३), प्राची दत्तात्रय कोतमिरे (८२.५०), गायत्री जोतिराम गोते (८०.१७). कला ः तनिषा दीपक जाधव (७९.१७), प्रमिला बापूसो मगदूम (७७.५०), समीक्षा राजाराम ऐताळे (७५).
..........
03833
सार्थक पलंगे, भक्ती देशपांडे, ऋतुजा उगले

कर्मवीर हिरे महाविद्यालयाचा निकाल ९५.५५ टक्के
गारगोटी ः येथील मौनी विद्यापीठाच्या कर्मवीर हिरे महाविद्यालयाचा १२ वी परीक्षा निकाल ९५.५५ टक्के लागला. यामध्ये विज्ञान शाखेचा ९९.२४, कला शाखेचा ८८.४८, वाणिज्य शाखेचा ९७.७५ टक्के निकाल लागला. शाखानिहाय निकाल असा - विज्ञान शाखा : सार्थक अरविंद पलंगे (७८.५०), भक्ती सुरेश देशपांडे (७५.५०), ऋतुजा सर्जेराव उगले (७४.१७). कला शाखा : स्नेहा अनिल झुरे (८४.८३), अजिंक्य पांडुरंग गडकरी (८३.८३), श्रेया प्रवीण भोई (८२.६७). वाणिज्य शाखा : श्रावणी गजानन वर्णे (८८), अरिसा महमदरफी बागवान (८१.००), संध्याराणी साताप्पा पाटील (७८.३३).
........
समर्थ कॉलेजचा निकाल ९२.७२ टक्के
गारगोटी : येथील गारगोटी हायस्कूल व श्री समर्थ ज्युनिअर कॉलेजचा १२ वी परीक्षेचा निकाल ९२.७२ टक्के लागला. कॉमर्सचा निकाल १०० टक्के, तर कला विभागाचा निकाल ८२.६० टक्के लागला. ज्युनिअर कॉलेजमधील अनुक्रमे विद्यार्थी असे ः कॉमर्स : शरयू रवींद्र गाडेकर (७८.१७), अमृता अरुण पाडळकर (७५.८३), पूजा बबन पोवार (७३.५०). कला : हर्षवर्धन मारुती म्हसवेकर (६७.६७), राज महेश देशपांडे (६३.८३), संस्कृती रवींद्र नांगरे (६३.३३).
...........
रघुनाथ न्यू इंग्लिश स्कूलचा निकाल ९६.४७ टक्के
कसबा वाळवे ः कसबा वाळवे (ता. राधानगरी) येथील रघुनाथ न्यू इंग्लिश स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचा निकाल ९६.४७ टक्के लागला. वाणिज्य शाखेच्या आलिशा झाकीर खाटिक हिने ८२.१७ टक्के गुण मिळवत कसबा वाळवे केंद्रात प्रथम क्रमांक पटकावला.
वाणिज्य शाखेचा ९६.४२ टक्के, तर कला शाखेचा निकाल ९६.५० टक्के लागला. वाणिज्य शाखा निकाल ः आलिशा झाकीर खाटिक (८२.१७), तनुप्रिया रघुनाथ मांडवकर (७३.३३), सानिका बाबासाहेब पाटील (६८.१७). कला शाखा ः रेशमा मारुती जाधव (७४.१७), राजवर्धन बाळासो भोसले (७२), प्रथमेश आप्पासो पाटील (७०.६७)
.......
देसाई विद्यालयाचा वाणिज्यचा निकाल १०० टक्के
कोनवडे ः मिणचे खुर्द (ता. भुदरगड) येथील आर. व्ही. देसाई माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा वाणिज्य शाखेचा निकाल १०० टक्के निकाल लागला. यशस्वी विद्यार्थी असे ः सानिया शकील मोमीन (८२.५०), सानिया रमजान मुल्ला (७१.७६), प्रणय सुनील देसाई (६०). कला विभागाचा निकाल ८० टक्के लागला. यशस्वी विद्यार्थी असे : प्रगती धोंडिराम परीट (७३.८३), सुप्रिया संतोष शिंदे (६३.६७), नम्रता आकाश परीट (६२.६७).
............
भोगावती महाविद्यालयाचा निकाल ९४.९६ टक्के
शाहूनगर ः कुरुकली (ता.करवीर) येथील भोगावती महाविद्यालयाचा बारावीचा निकाल ९४.९६ टक्के लागला. कला शाखा ८८.९५, विज्ञान ९८.७८, तर वाणिज्य विभागाचा निकाल ८७ टक्के लागला. कला शाखा अनुक्रमे : साक्षी सुरेश लिंगडे (८६.१७), चैत्राली नंदकुमार पोतदार (८५.८३), दीक्षा बाळासो कांबळे (७७.५). शास्त्र शाखा ः हर्षवर्धन उदय पाटील (८८.६७), विवेक चंद्रकांत मगदूम (८८.५), मनाली महादेव शेटे (८६.१७). वाणिज्य शाखा : वर्षा वसंत पाटील (८७.१७), वैष्णवी बबन पाटील (८२.६७), स्नेहल मारुती परीट (८२.३३).
.............
03839
संदीप देसाई, राजनंदिनी भोईटे, पार्थ चौगुले

आबिटकर ज्युनिअर कॉलेजचा १०० टक्के निकाल
गारगोटी ः येथील युवा ग्रामीण विकास संस्था संचलित श्री आनंदराव आबिटकर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजच्या विज्ञान शाखेचा इयत्ता १२ वी
परीक्षेचा निकाल १०० टक्के लागला. गुणानुक्रमे यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे आणि कंसात टक्केवारी अशी : संदीप उत्तम देसाई (७५.८३), राजनंदिनी प्रतापसिंह भोईटे (७४.१७), पार्थ विजय चौगुले (७३.६७), तृप्ती तानाजी सावंत (७२.००), हर्षवर्धन रवींद्र जठार (६९.३३).
....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com