गारगोटी : तहसील कचेरीवर मोर्चा

गारगोटी : तहसील कचेरीवर मोर्चा

Published on

got81.JPG B03983
गारगोटी : बिद्री साखर कारखान्यावर केलेल्या कारवाईच्या विरोधात तहसील कार्यालयावर काढलेला मोर्चा.

''गद्दार'' आमदारांना जनता धडा शिकवेल
के. पी. पाटील : ''बिद्री'' कारवाई विरोधात तहसीलवर मोर्चा

गारगोटी, ता. ८ : सभासद हिताचा कारभार करून उच्चांकी दर देणाऱ्या बिद्री साखर कारखान्याच्या प्रगतिआड येणाऱ्या गद्दार आमदारांना आगामी निवडणुकीत जनता धडा शिकवेल, असा टोला माजी आमदार के. पी. पाटील यांनी आमदार प्रकाश आबिटकर यांना लगावला.
बिद्री येथील दूधगंगा-वेदगंगा सहकारी साखर कारखान्यावर राजकीय हस्तक्षेपाचा वापर करून उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना हाताशी धरून केलेल्या कारवाईच्या विरोधात येथील भुदरगड तहसील कार्यालयावर सभासद आणि शेतकऱ्यांनी काढलेल्या मोर्चाप्रसंगी ते बोलत होते. हुतात्मा चौकातून मोर्चास सुरुवात झाली. तहसील कचेरीसमोर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी शेतकरी, सभासद, पदाधिकाऱ्यांच्या हस्ते तहसीलदारांना निवेदन दिले.
पाटील म्हणाले, ‘बिद्री साखर कारखान्याने चांगला ऊस दर, कामगारांना बोनस दिला आहे. कारखाना विस्तारीकरण, सहवीज निर्मिती, इथेनॉल प्रकल्प सुरू केला आहे. मात्र, आमदार प्रकाश आबिटकर यांनी सत्तेचा गैरवापर करून कारखान्याला कारवाईच्या फेऱ्यात अडकविले आहे.’
भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई म्हणाले, ‘बिद्री साखर कारखान्यावरील कारवाई मागे घ्यावी यासाठी प्रयत्न करणार आहे. ज्यांनी ही कारवाई करण्यास भाग पाडले त्यांना विधानसभा निवडणुकीत सभासद आणि कामगार जागा दाखवतील.’
शेखर देसाई, रामभाऊ कळबेकर, संदीप देसाई, सर्जेराव देसाई यांची भाषणे झाली. संचालक सत्यजित जाधव, मधुकर देसाई, पंडितराव केणे, सम्राट मोरे, जगदीश पाटील, प्रकाश देसाई, शामराव देसाई, सरपंच प्रकाश वास्कर, अनिल तळकर, सरपंच प्रकाश वास्कर, मच्छिंद्र मुगडे, एस. एम. पाटील, जीवन पाटील, एम. डी. पाटील, पांडुरंग कदम, सुनील कांबळे, आदी उपस्थित होते. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विश्वनाथ कुंभार यांनी आभार मानले.

चौकट
आबिटकरांविरोधात फलक, घोषणा
मोर्चात आमदार आबिटकर यांच्यावर जोरदार टीका करणारे फलक घेऊन कार्यकर्ते सहभागी झाले होते. तसेच त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत ते जात होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.