गारगोटी : मुख्याध्यापकांची सहविचार सभा

गारगोटी : मुख्याध्यापकांची सहविचार सभा
Published on

4570
गारगोटी : मुख्याध्यापकांच्या सहविचार सभेत गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांचा सत्कार करताना मिलिंद पांगिरेकर. शेजारी सुरेश पाटील, निशिकांत चव्हाण, ए. एम. पाटील आदी.
......
गुणवत्तावाढीसाठी नियोजन
आवश्यक : दीपक मेंगाणे

गारगोटी, ता. २६ : ‘विद्यार्थी व शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मुख्याध्यापकांनी योग्य नियोजन करणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांनी केले.
भुदरगड तालुका मुख्याध्यापक संघाच्या वतीने येथील उदाजीराव डी. एड. कॉलेजमध्ये माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांची सहविचार सभा झाली. यावेळी एन.एम.एम.एस. परीक्षेत भुदरगड तालुका राज्यात अव्वल ठरल्याबद्दल गटशिक्षणाधिकारी दीपक मेंगाणे यांचा सत्कार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष मिलिंद पांगिरेकर यांच्या हस्ते झाला. मेंगाणे यांनी अध्ययनस्तर निश्चिती, वार्षिक परीक्षा, शालेय पोषण आहार, एन.एम.एम.एस. परीक्षा तयारी नियोजन, शाळास्तरावरील समित्यांचे एकत्रिकरण, शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रम आदीबाबत मार्गदर्शन केले.
यावेळी मुख्याध्यापक संघाचे संचालक निशिकांत चव्हाण, डॉ. ए. एम. पाटील यांच्यासह तालुक्यातील मुख्याध्यापक उपस्थित होते. तालुकाध्यक्ष सुरेश पाटील यांनी स्वागत केले. मिलिंद पांगिरेकर यांनी प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष एस. के. कासार यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com