Sat, June 3, 2023

हेरलेत आज आरोग्य शिबिर
हेरलेत आज आरोग्य शिबिर
Published on : 8 February 2023, 12:47 pm
हेरलेत आज
आरोग्य शिबिर
हातकणंगले : महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर व ट्यूलिप हॉस्पिटलतर्फे हेरले येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उद्या (ता. ९) सकाळी १० वाजता आरोग्य शिबिर आयोजित केले आहे. यामध्ये फिजिशियन, स्त्री रोगतज्ज्ञ, होमिओपॅथी तसेच आयुर्वेदतज्ज्ञ व अस्थिरोगतज्ज्ञ डॉक्टरांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. रक्त, लघवी, सीबीसी शुगर, एचआयव्ही हिपॅटीस बी, सिरम, कॅल्शिअम व थायरॉईड तपासणी, ईसीजी (कार्डिओग्राम) व इतर जनरल तपासणी मोफत करण्यात येणार आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्राथमिक आरोग्य केंद्र हेरलेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राहुल देशमुख यांनी केले आहे. याचबरोबर महाराष्ट्र शासनाची जागरुक पालक तर सुरक्षित बालक या मोहिमेचे उद्घाटन हेरले सरपंच राहुल शेटे यांच्याहस्ते होणार आहे.