हातकणंगलेत अवैध धंदे पुन्हा सुरू

हातकणंगलेत अवैध धंदे पुन्हा सुरू

हातकणंगलेत अवैध धंदे पुन्हा सुरू
पोलिस अधीक्षकांच्या आदेशाला केराची टोपली
अतुल मंडपे ः सकाळ वृत्तसेवा
हातकणंगले, ता. १३ ः येथील पोलिस ठाण्याच्या हद्दीत बंद असलेले जुगाराचे अड्डे (क्लब) पुन्हा सुरू झाले आहेत. त्याचबरोबर परिसरातील मटका, गुटखा खुलेआमपणे सुरू झाला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर अवैध धंदे सुरू झाले आहेत.
जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी अवैध धंदे बंद करण्याचे आदेश दिले असतानाही त्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. कोरोनात हातकणंगले पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अनेक क्लब बंद होते. ते परत सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू होते. मात्र त्यात त्यांना यश आले नव्हते. पंधरा-वीस दिवसांपासून मात्र हातकणंगले, आळते, कुंभोज, रुकडी, हेरले, मुडशिंगी आदी परिसरात अनेक क्लब परत नव्या जोमाने सुरू झाले आहेत. पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर अनेक टपऱ्यांमध्ये खुलेआम गुटखा विकला जात आहे. मोबाईल मटकाही जोमात आहे. यातून कोट्यवधीची उलाढाल होत आहे. अनेक बुकीचालकांनी हातकणंगलेकडे लक्ष केंद्रीत केले असून, जागांची चाचपणी सुरू आहे.
------------
सर्वच अधिकाऱ्‍यांना अवैध धंदे पूर्णतः बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत तरीही काही ठिकाणी सुरू असतील तर कारवाई केली जाईल.
- रोहिणी सोळंके,
उपविभागीय पोलिस अधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com