गरजूंचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश करा

गरजूंचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश करा

Published on

04055
हातकणंगले : महेश खिलारे यांना निवेदन देताना वैभव कांबळे. शेजारी अप्पासाहेब एडके, संपत पवार, धनाजी पाटील, आदी
--------
गरजूंचा अन्नसुरक्षा योजनेत समावेश करा
हातकणंगलेत ‘स्वाभिमानी’तर्फे तहसीलदारांकडे मागणी
सकाळ वृत्तसेवा
हातकणंगले, ता. ९ : तालुक्यातील निराधार, विधवा, अपंग शेतमजूर, अल्पभूधारक, शेतकरी, घरेलू कामगार अशा गरजू अनेक लोकांना रेशन मिळत नाही. त्यांना अन्नसुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट करून रेशनकार्डवरील धान्य मिळावे यासाठी आज हातकणंगले येथे स्वाभिमानी पक्षातर्फे जिल्हाध्यक्ष वैभव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली अपर तहसीलदार महेश खिलारे यांना निवेदन दिले.
रेशनकार्डवर रेशन मिळण्याची ऑनलाईन प्रक्रिया सामान्य जनतेच्या हितासाठी म्हणून केली आहे. पण, त्यामध्ये त्रुटी असल्यामुळे लोकांना त्रास होत आहे. ऑनलाईन कामांमधील त्रुटी दूर कराव्यात, रेशन कार्ड रजिस्ट्रेशनसाठी बारा अंकी नंबर आल्याशिवाय पुढील कोणतीही कारवाई होत नाही. हा बारा अंकी नंबर मिळण्यास विलंब होत आहे. नवीन नाव कार्डवर समाविष्ट करणे व कमी करणे याला दोन-तीन महिने लागत आहेत. दुबार रेशनकार्ड, विभक्त रेशनकार्ड मिळण्यास विलंब होत आहे. रेशनधान्य व रेशनकार्डवरील दुरुस्तीसाठी एक खिडकी योजना राबवावी, आदी मागण्या केल्या आहेत. तसेच आंदोलनाचा इशारा दिला आहे. तालुकाध्यक्ष अप्पासाहेब एडके, संपत पवार, धनाजी पाटील, शिवाजी आंबेकर, आण्णा मगदूम, शिवाजी पाटील उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.