मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे

मुख्यमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे
Published on

शेतकरी कर्जमाफप्रश्नी
‘स्वाभिमानी’चे काळे झेंडे

हातकंणगले, ता. २३ : ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करू, असे जाहीरनाम्यात सांगितले होते. आता उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकऱ्यांची कर्जमाफी करता येणार नाही, असे म्हणून शेतकऱ्यांची फसवणूक करत आहेत, असा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने मजले (ता. हातकंणगले) येथे मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. सांगली येथील भाजप कार्यकर्ता मेळावा संपवून कोल्हापूर विमानतळाकडे जात असताना सायंकाळी पाचच्या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात घोषणाबाजी करत सांगली-कोल्हापूर महामार्गावर मजले येथे काळे झेंडे दाखविले.
कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यामुळे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरीही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गनिमी कावा करत काळे झेंडे दाखविले. अवकाळी पाऊस , दुष्काळ , वाढलेली महागाई यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे. यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे तातडीने संपूर्ण कर्जमाफी करावी अन्यथा संपूर्ण राज्यभर यापेक्षाही तीव्र आंदोलन करणार असल्याचा निर्धार स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com