शिवरायांच्या पुतळ्यासाठी लवकरच निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवरायांच्या पुतळ्यासाठी लवकरच निधी
शिवरायांच्या पुतळ्यासाठी लवकरच निधी

शिवरायांच्या पुतळ्यासाठी लवकरच निधी

sakal_logo
By

02100
हुपरी: येथील नदी वेस रस्त्याच्या खडीकरण व डांबरीकरण प्रारंभप्रसंगी आमदार राजूबाबा आवळे, नगराध्यक्ष जयश्री गाट, मानसिंगराव देसाई, भरत लठ्ठे, दौलतराव पाटील किरण पोतदार, बाळासाहेब जाधव आदी.
--------
शिवरायांच्या पुतळ्यासाठी लवकरच निधी
आमदार राजूबाबा आवळे; हुपरी येथे रस्ता खडीकरण, डांबरीकरण प्रारंभ
हुपरी, ता. ८ : कोणताही पक्ष, गट तट अगर समाज न पाहता मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी भरीव स्वरूपात काम करण्याचा संकल्प आहे. हुपरी परिसरात विविध विकासकामांसाठी आजअखेर सुमारे नऊ कोटींचा निधी खर्च केला असून शहरात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळा उभारण्याच्या पहिल्या टप्प्याच्या कामासाठी २५ लाख रुपयांचा निधी लवकरच दिला जाईल, अशी घोषणा आमदार राजूबाबा आवळे यांनी येथे केली.
येथील अष्टविनायक गणेश मंदीर ते पंचगंगा नदीपर्यंतच्या पालखी मार्गाच्या आमदार निधितून एक कोटी ४० लाखांच्या रस्ते खडीकरण व डांबरीकरण कामाचा प्रारंभ आमदार आवळे यांच्याहस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा जयश्री गाट होत्या.
नगराध्यक्ष गाट म्हणाल्या, ‘शहराचा प्रथम नागरिक म्हणून सर्व लोकप्रतिनिधी व नगरसेवक यांना सोबत पाच वर्षात रस्ते, वीज, पाणी या मूलभूत गरजासह विविध स्वरूपात कोट्यावधींची विकासकामे केली आहेत.
मानसिंगराव देसाई, माजी सरपंच दिनकरराव ससे , नगरसेवक दौलतराव पाटील, माजी उपनगराध्यक्ष भरत लठ्ठे, गणेश वाईंगडे, नगरसेविका अनिता मधाळे, राजाराम देसाई, किरण पोतदार, बाळासाहेब जाधव, विरकुमार शेंडूरे, अमरसिंह माने, अरिहंत बल्लोळे , धर्मवीर कांबळे, नितीन गायकवाड, सज्जन रावळ, सुनील कुंभार, प्रताप जाधव, सुबराव काटकर आदी उपस्थित होते.