
हुपरीत शास्त्रीय संगीत सभा
02191
हुपरी: विश्वनाथबुवा जोशी (नाना) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तसेच गुरुवर्य चिंतूबुवा म्हैसकर (सांगली) यांच्या जन्मशताब्दीनिमित्त रंगलेली संगीत सभा मैफील.
-------------
हुपरीमध्ये संगीत सभा
हुपरी, ता. २४ : येथील जुन्या काळातील नामवंत हार्मोनियमवादक व संगीत भजन शिक्षक विश्वनाथबुवा जोशी (नाना ) यांच्या स्मृतीप्रित्यर्थ तसेच गुरुवर्य चिंतूबुवा म्हैसकर (सांगली) यांच्या जन्मशताब्दीनिमित्त येथे समस्त जोशी परिवारातर्फे संगीत सभेचे आयोजन केले होते.
यशवंतराव पाटील यांच्याहस्ते प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करुन उद्घाटन झाले. त्यानंतर तबला जुगलबंदी, एकल तबलावादन, शास्त्रीय व उपशास्त्रीय गायन अशा संगीत कार्यक्रमांमध्ये मुडशिंगीतील प्रसिद्ध तबलावादक अतुल ताडे यांचे गुरुकुलातील शिष्य अथर्व देशपांडे (हुपरी), सन्मती अवघडे (पट्टणकोडोली), प्रशांत शेवाळे (कारदगा) आणि रविराज पोतदार (लाडवाडी) यांची तबला जुगलबंदी झाली. चिदानंद ताडे (मुडशिंगी) याने एकल तबला वादन केले. त्यांना संवादिनी लेहरा साथ आनंद गुलगुंजे (इचलकरंजी) यांनी दिली.
दुसऱ्या सत्रात शास्त्रीय व उपशास्त्रीय गायनामध्ये नुपूर देसाई (सांगली) व संगीत गुरुकुलातील प्रशिक्षक कृष्णा मुखेडकर (बिदर) यांनी उपस्थित संगीतप्रेमींना शास्त्रीय संगीताची मेजवानी दिली. त्यांना संगीत साथ नचिकेत हरिदास, पुणे (संवादिनी), रवींद्र नाशिककर, सांगली (तबला) व सौरभ सनदी (कोल्हापूर) यांची तर सहगायन सृष्टी करंदीकर (सांगली), तालवाद्य राजाभाऊ कुलकर्णी (सांगली) यांची लाभली. सांगलीचे बाळासाहेब कुलकर्णी, श्रीकृष्ण गोडबोले, विकास जोशी, विशाल जोशी, विलास जोशी, चंद्रकांत जोशी, सागर जोशी, प्रकाश देशपांडे, सुधीर कुलकर्णी आदी उपस्थित होते.