यळगूड मध्ये तरूणाची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यळगूड मध्ये तरूणाची आत्महत्या
यळगूड मध्ये तरूणाची आत्महत्या

यळगूड मध्ये तरूणाची आत्महत्या

sakal_logo
By

02217 - निलेश खामकर
...

यळगूडमध्ये तरूणाची आत्महत्या

हुपरी, ता.१४ : यळगूड येथील तरुणाने राहत्या घरी दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी उघडकीस आली. निलेश मारुती खामकर (वय २३, रा. झेंडा चौक) असे त्याचे नाव आहे. त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही. घटनेची नोंद हुपरी पोलिसांत झाली आहे.

पोलिसांनी सांगितले की, निलेश हा आई वडिलांसह राहावयास होता. तो अविवाहित होता. तो घराच्या दुसऱ्या मजल्यावरील खोलीत झोपावयास गेला होता. सकाळ झाली तरी तो उठला नसल्याचे पाहून आईने त्याच्या खोलीत डोकावले असता त्याने खोलीमधील छतास सिंलीग फॅन लावण्यासाठी असलेल्या लोखंडी हुकाला दोरीने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. उपचारासाठी तातडीने त्याला दवाखान्यात दाखल केले असता त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरनी सांगितले.
दरव्यान, सकाळपासूनच निलेश याला त्याचे मित्र फोन लावत होते. पण फोन स्वीच ऑफ लागत होता. पोलिसांना घटनास्थळी मृत निलेश याचा मोबाईल त्याच्या बॅगेमध्ये फुटलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. तो एका रेशन दुकानात सेल्समन म्हणून कामास होता. परिसरातील एका गावातील ग्रामपंचायतीमध्ये त्याने डाटा ऑपरेटर म्हणूनही काम केले होते. अधिक तपास सहायक पोलिस निरीक्षक पंकज गिरी करत आहेत.