रोपे आणण्यासाठी इचलकरंजी महापालिका कर्मचाऱ्याचा आकस्मिक मृत्यू

रोपे आणण्यासाठी इचलकरंजी महापालिका कर्मचाऱ्याचा आकस्मिक मृत्यू

इचलकरंजी मनपा
कर्मचाऱ्याचा आकस्मिक मृत्यू

हुपरीः वृक्ष लागवडीसाठी रोपे आणण्यासाठी कागल येथे गेलेल्या इचलकरंजी महापालिकेच्या बाग बगीचा विभागाकडील कर्मचाऱ्याचा आकस्मिक मृत्यू झाला. सुभाष हरी जडगे (वय ४५, रा. इंदिरा नगर इचलकरंजी) असे त्यांचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता.३) दुपारी सव्वाचारच्या सुमारास पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील रेमंड चौक परिसरात घडली. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दरवर्षीप्रमाणे यंदाच्या पावसाळ्यात इचलकरंजी महापालिकेतर्फे ''झाडे लावा, झाडे जगवा '' मोहिमेचा संकल्प सोडला आहे. त्यासाठी कर्मचारी सुभाष जडगे एका टेंपोमधून रोपे आणण्यासाठी कागल येथील शासकीय नर्सरी येथे सकाळी गेले होते. परत येत असताना अचानक उलटी होऊन ते बेशुद्ध पडले. सोबतच्या सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी पट्टणकोडोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ. औंधकर यांनी स्पष्ट केले. घटनेची नोंद हुपरी पोलिस ठाण्यात झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com