Tue, March 21, 2023

कृष्णा पाणी योजनेला
शिरढोण येथे गळतीकृष्णा पाणी योजनेला
शिरढोण येथे गळती
कृष्णा पाणी योजनेला शिरढोण येथे गळतीकृष्णा पाणी योजनेला शिरढोण येथे गळती
Published on : 15 February 2023, 4:23 am
कृष्णा पाणी योजनेला
शिरढोण येथे गळती
इचलकरंजी : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेच्या जलवाहिनीला शिरढोण येथे गळती लागली आहे. ती काढण्याचे काम दोन दिवस चालणार असल्याने पाणी पुरवठा विस्कळीत होणार आहे. याबाबत महापालिका प्रशासनाकडून माहिती देण्यात आली. शिरढोण (ता. शिरोळ) मधील बाणदार हायस्कूलजवळ असलेल्या कृष्णा योजनेच्या पाईपलाईनला गळती लागली आहे. त्यामुळे गुरुवार (ता. 16) व शुक्रवार (ता 17) असे दोन दिवस गळती काढण्याचे काम सुरू राहणार आहे. या कालावधीत कृष्णा नदीतील पाणी उपसा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाणी साठा जपून वापरावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाकडून केले आहे.