Tue, March 28, 2023

मनपा आवश्यक
मनपा आवश्यक
Published on : 13 March 2023, 6:50 am
आसरानगर परिसरात
कचरा डेपोला आग
इचलकरंजी, ता.१३ : येथील आसरानगर परिसरातील मनपाच्या कचरा डेपोला आग लागल्याने परिसरात धुराचे लोट निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्रिय अधिकारी सचिन हरबट यांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत महापालिकेला नोटीस बजावण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगीतले. आसरानगर येथील कचरा डेपोला वारंवार आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे या भागात धुराचे लोट निर्माण होऊन भागातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होत आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचे विकास जगताप यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती. त्याची गांभीर्याने दखल घेत क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.