इचलकरंजी प्रांताधिकारी पदी मौसमी बेर्डे-चौगुले

इचलकरंजी प्रांताधिकारी पदी मौसमी बेर्डे-चौगुले

इचलकरंजी प्रांताधिकारी पदी मौसमी बेर्डे-चौगुले

इचलकरंजीः येथील प्रांताधिकारीपदी मौसमी बेर्डे-चौगुले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांची सांगली जिल्ह्यात भूसंपादन अधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने सहा दिवसांपासून प्रांताधिकारी पद रिक्त होते. येथे कोणाची वर्णी लागणार याकडे अनेकांचे लक्ष लागून होते. मौसमी बेर्डे-चौगुले यांची नियुक्ती झाल्याने चर्चेला विराम मिळाला आहे. मौसमी बेर्डे-चौगुले यांनी या आधी भोर(पुणे) च्या उपविभागीय अधिकारी त्यानंतर साताऱ्यात भूसंपादन क्रमांक नऊ येथे उपजिल्हाधिकारी म्हणून काम पहिले आहे. तेथून बदली होवून त्या सांगली जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारीपदी रुजू होत्या. गेल्या आठवड्यात त्यांची सांगली जिल्हा निवासी उपजिल्हाधिकारी पदावरून बदली झाली होती. मात्र ठिकाण निश्चित नव्हते नसल्याने त्या रुजू झाल्या नव्हत्या. त्यांना शुक्रवारी इचलकरंजी येथील प्रांताधिकारी कार्यालयात बदलीचे आदेश प्राप्त झाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com