कामगारांना मजुरीवाढ देवू नये

कामगारांना मजुरीवाढ देवू नये

कामगारांना मजुरीवाढ देऊ नये
इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनचे आवाहन
इचलकरंजी, ता. २९ : यंत्रमाग कामगारांच्या मजुरीमध्ये ५२ पिकास प्रती मीटर १० पैशांची वाढ सहायक कामगार आयुक्त यांनी घोषित केलेली आहे. या मजुरी वाढीस यापूर्वीच विरोध केला असतानांही एकतर्फी वाढ घोषित केलेली आहे. त्यामुळे ही घोषित केलेली मजुरी कारखानदारांनी देऊ नये, असे आवाहन इचलकरंजी पॉवरलूम असोसिएशनने केले आहे.
२०१३ मध्ये यंत्रमागधारक संघटना व कामगार संघटनांमध्ये दरवर्षी महागाई भत्यास अनुसरून मजुरी वाढ करण्याचा करार झाला होता. पण यंत्रमाग उद्योगातील भयानक मंदी, वारंवार सुताचे बदलते दर, सुट्या भागांची दरवाढ, विजेच्या दरामध्ये झालेली भरमसाठ वाढ या कारणांमुळे अडचणीत असलेल्या या उद्योगास दरवर्षी मजुरीवाढ देणे अशक्य बनले. तसेच ट्रेडिंग असोसिएशनने खर्चीवाल्या यंत्रमागधारकांना गेल्या नऊ वर्षांत कोणतीही मजुरीमध्ये वाढ केली नाही. त्यामुळे गेल्या ५ वर्षांपासून यंत्रमागधारक संघटना या करारातून बाहेर पडलेल्या आहेत. तसा ठराव यंत्रमागधारकांच्या मेळाव्यामध्ये होऊन या ठरावाची प्रत सहायक कामगार आयुक्त यांना त्यावेळी दिलेली आहे. त्याचबरोबर गेल्या ५ वर्षांमध्ये वेळोवेळी घोषणा झालेली मजुरी वाढीची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. याहीवर्षी मजुरी वाढीस विरोध दर्शवला होता. असे असताना चार महिन्यानंतर सहायक कामगार आयुक्तांनी एकतर्फी मजुरीवाढीची घोषणा केली आहे. हा निर्णय चुकीचा आणि उद्योगास न पेलवणारा आहे. मागील चार महिन्यांत उत्पादित झालेल्या कापडाची विक्री झालेली आहे. आत्ता गेल्या जानेवारी महिन्यापासून वाढ द्या, म्हणणे चुकीचे आहे. त्यामुळे या निर्णयास विरोध आहे, असे असोसिएशनकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
---------------
कोट
फक्त इचलकरंजी केंद्रामध्ये दरवर्षी मजुरीवाढ घोषित केल्यामुळे येथील उत्पादन खर्च इतर केंद्रापेक्षा प्रचंड वाढला आहे. इचलकरंजीतील कापडास बाहेरील बाजारपेठेतून मागणी येणे कमी झालेले आहे. परिणामी, येथील उद्योग चालू ठेवणे मुश्‍कील झालेले आहे. त्यामुळे त्वरित सहायक कामगार आयुक्तांनी ही घोषित केलेली एकतर्फी वाढ मागे घ्यावी.
- चंद्रकांत पाटील, अध्यक्ष, इचलकरंजी पॉवरलूम विव्हर्स असोसिएशन

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com